Friday, April 17, 2026
Homeभद्रावती“भंगारवाल्याची कमाल! रस्त्यालाच बनवलं स्वतःचं गोदाम”

“भंगारवाल्याची कमाल! रस्त्यालाच बनवलं स्वतःचं गोदाम”

भंगाराच्या आडून शासकीय रस्त्यावर डल्ला; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन..!
इम्रान खान..

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

शहरातील झिंगुजी प्रभाग क्रमांक ७ मधील वाल्मीक चौकाजवळील शिवरकर सोसायटी ते मच्छी मार्केटकडे जाणारा रस्ता सध्या रस्ता कमी आणि भंगार प्रदर्शन जास्त झाल्याचे चित्र दिसत आहे. एका भंगार व्यवसायिकाने रस्त्यावर भंगाराचे ढिगारे, लाकूड आणि विविध साहित्य रचून शासकीय रस्त्यालाच जणू खासगी भंगार डेपो बनवला आहे.

परिसरातील नागरिकांच्या मते, या मार्गावरून जाताना वाहन चालवण्यापेक्षा अडथळा शर्यत (Obstacle Race) पूर्ण केल्यासारखा अनुभव येतो. काही नागरिक तर विनोदाने म्हणत आहेत की,
“भद्रावतीत आता नवीन पर्यटन स्थळ तयार झाले आहे ‘भंगार सफारी रोड’!”

रस्त्याचा मोठा भाग भंगाराच्या ढिगाऱ्यांनी व्यापल्यामुळे दुचाकी चालक, पादचारी आणि मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या नागरिकांना रस्ता शोधण्यासाठीच मोहीम राबवावी लागते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया परिसरात ऐकायला मिळत आहे.

या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांद्वारे नगर परिषद भद्रावती प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.

नागरिकांचा प्रश्न मात्र सरळ आहे
“हा रस्ता आहे की भंगार डेपो?”

दरम्यान, भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर स्थानिक नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल.

या प्रकारामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून रस्ता मोकळा होणार की भंगाराचं साम्राज्य वाढणार? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!