भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील पारोधी घाट परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात येण्याआधीच स्थानिक नागरिकांनी काढलेले फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतरच कारवाई झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ११.५० वाजता, काटवाल गावाजवळ रेतीने भरलेला ट्रॅक्टर जात असताना तलाठी शुभम धात्रक यांनी कारवाई करत वाहन ताब्यात घेतले.
सदर ट्रॅक्टरचा मालक सुमित गीर सावळे असून वाहनावर नोंदणी क्रमांक नसल्याचे आढळून आले. नदीपात्रातून थेट उत्खनन करून रेती वाहतूक केली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, महसूल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारोधी, आष्टा व परिसरातील काही संवेदनशील भागात रेती तस्कर इतके बिनधास्त झाले आहेत की, कारवाईदरम्यान पथकावर हल्ला करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांचे मत:
“फोटो व्हायरल झाला म्हणून कारवाई झाली… नाहीतर हे असंच चालू राहिलं असतं!”
“दिवसाढवळ्या रेती चोरी होते, मग प्रशासनाला आधी कसं दिसत नाही?”
“कारवाई होते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार सुरू हीच खरी परिस्थिती!”
दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे
भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खननावर खरंच नियंत्रण येणार का?सध्या महसूल विभागाकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर प्रकरणासंदर्भातील अधिक माहिती, तसेच अवैध रेती उत्खननाशी संबंधित इतर बाबींबाबत तपशील पुढील भागात प्रसिद्ध करण्यात येईल…
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


