रात्री ९.१५ वाजता सुमठाणा येथे सापळा; SDM संदीप भस्के ॲक्शन मोडमध्ये..!
रेती माफियांना थेट इशारा…भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीने उग्र रूप धारण केले असताना महसूल प्रशासनाने कडक पवित्रा घेत निर्णायक कारवाई केली आहे. मौजा सुमठाणा परिसरात दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता टाकण्यात आलेल्या सापळ्यात रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, अवैध रेती तस्करीविरोधात प्रशासनाने ठोस संदेश दिला आहे.
महसूल सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार,..गवराळा (चिरादेवी) येथील नाल्यातून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी (SDM) वरोरा संदीप भस्के यांनी स्वतः पुढाकार घेत कारवाईचे नियोजन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शुभम धात्रक यांनी सुमठाणा परिसरात सापळा रचून संशयित वाहनांवर बारकाईने नजर ठेवली.
रात्रीच्या अंधारातही धात्रक यांनी दाखवलेली सतर्कता अचूक ठरली. कारवाईदरम्यान रितेश बच्चू (रा. गवराळा, भद्रावती) यांचा विनापरवाना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला. महसूल विभागाने तत्काळ वाहन जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाचा कडक संदेश स्पष्टपणे पोहोचला. तलाठी शुभम धात्रक यांनी संशयित ट्रॅक्टर पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर SDM संदीप भस्के यांच्या नेतृत्वामुळे कारवाई प्रभावी ठरली. ही मोहीम तालुक्यातील रेतीच्या काळ्या धंद्यावर मोठा प्रहार मानली जात आहे.
“अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. नाले, नदीपात्र आणि घाटांवरील अवैध उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी धाडसत्रांना आणखी वेग दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.
या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.
“अशा धडक कारवाया नियमित झाल्यासच रेती माफियांना आळा बसेल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.गवराळा व सुमठाणा परिसरातील रहिवाशांनी तलाठी शुभम धात्रक यांच्या धाडसाचे कौतुक करत म्हटले,
“रात्री सापळा रचून ट्रॅक्टर पकडणे सोपे नाही. असे अधिकारी असतील तरच तस्करी थांबेल.”एका शेतकऱ्याने सांगितले,
“नाल्यांचे नुकसान होत होते; आता प्रशासन जागे झाले याचा आनंद आहे.”SDM संदीप भस्के आणि तलाठी शुभम धात्रक यांनी दाखवलेली तत्परता व कडक भूमिका लक्षवेधी ठरली आहे. भद्रावती तालुक्यात अवैध रेती तस्करीविरोधातील मोहीम आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, प्रशासनाचा धडाका पुढेही कायम राहणार असे चित्र दिसत आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


