चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
मूल , प्रतिनिधी
जुबेद शेख
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, मूल शहराच्या वतीने शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध बौद्ध विहार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
शहरातील विविध भागात झालेल्या या कार्यक्रमांना नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रविनजी मोहूर्ले, तसेच मिलिंद खोब्रागडे आणि दिलीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
या प्रसंगी किरण कापगते, मनिषा गाडलेवार, अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार, संगीता वाळके, वंदना वाकडे, कल्पना मेश्राम, लीना बदेलवार, निलेश राय, जितेंद्र टिंगुसले, राकेश ठाकरे, गौतम जीवने, संदीप मोहबे, गुरुदास भेंडारे, आयेशा शेख, विलास जुमडे, युवराज चावरे, प्रेमकुमार देवगडे, शरद वाकडे, आनंद आक्केवार, रुपेश निकोडे, आस्तिक मेश्राम, प्रकाश आईटवार, सुखदेव चौथाले, बिंदूताई जुमडे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. उपस्थितांनी सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षण यांचा संदेश आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महामानवाला अभिवादन केले.


