भद्रावती तहसील कार्यालयात ‘चोरांचा वर्कशॉप’ सुरू? जप्त ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्स गायब; सुरक्षा झोपेत!
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तहसील कार्यालय म्हणजे सरकारी ताब्यातील जप्त मालमत्तेचा सुरक्षित किल्ला… की चोरांसाठी खुलं वर्कशॉप? असा संतप्त आणि उपरोधिक प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
अवैध उत्खनन प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधील महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स अक्षरशः नियोजनपूर्वक ‘उचलून’ नेण्यात आल्याची माहिती समोर आली असली, तरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
विशेष म्हणजे, हे स्पेअर पार्ट्स काढण्यासाठी साधारण दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. म्हणजेच चोरांनी कोणतीही घाईगडबड न करता निवांतपणे ‘काम’ केलं आणि मोकळेपणाने निघून गेले! इतक्या वेळातही तहसील कार्यालयातील यंत्रणेला याची साधी चाहूलही लागली नाही, ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण ठरत असल्याची बोचरी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
“जप्त केलं की सुरक्षित झालं” ही संकल्पना भद्रावतीत पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र समोर येत आहे. कारण ज्या ठिकाणी सरकारी ताब्यातील मालमत्ता सुरक्षित ठेवली जाते, तिथूनच ती गायब होत असेल, तर चोरांसाठी हीच ‘सर्वात सुरक्षित जागा’ ठरत आहे का, असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे. “सरळ तहसीलमध्ये जा आणि पार्ट्स काढून आणा!” असा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
सदरम्यान, ट्रॅक्टर ट्रॉली चोरीस गेल्याचीही चर्चा परिसरात रंगत असली, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे “आज पार्ट्स, उद्या ट्रॉली… परवा पूर्ण ट्रॅक्टर?” अशी उपरोधिक चर्चा अधिकच रंगत आहे.
महसूल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
आज पार्ट्स… उद्या काय? तहसीलमधील ‘गायब’ मालिकेचा पुढील भाग लवकरच…!


