भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती पोलीस स्टेशनला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी भेट देत पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन पारधी यांचा सन्मान करण्यात आला.
योगेश्वर पारधी हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि परिणामकारक काम करणारे अधिकारी म्हणून भद्रावतीत ओळखले जातात. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी घेतलेले ठोस निर्णय, गुन्हेगारीवर ठेवलेले प्रभावी नियंत्रण आणि नागरिकांशी ठेवलेला थेट संवाद यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक मजबूत होताना दिसत आहे.
इम्रान खान यांनी यावेळी मत व्यक्त करत सांगितले की,
“पारधी सरांनी आपल्या कामातून भद्रावतीत सुरक्षिततेची भक्कम भावना निर्माण केली आहे. त्यांचे नेतृत्व, धाडस आणि प्रामाणिकपणा हे खरोखरच प्रेरणादायी आहे.”
पारधी यांनी शुभेच्छा स्वीकारत नम्रपणे सांगितले की, जनतेचा विश्वास आणि सहकार्य हाच आपल्या कामाचा खरा आधार आहे. पुढेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जबाबदारीने कार्यरत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भद्रावतीत शांतता आणि सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यात पारधी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
तसेच ‘ऑनलाईन न्यूज रोखठोक’ तर्फेही पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :-न्यूज डेस्क टीम✨💐


