Wednesday, October 28, 2026
Homeभद्रावतीरस्ता प्रकरण न्यायप्रविष्ट; प्रशासनाकडून कार्यवाही सुरू, पर्यायी मार्गाची मागणी...!

रस्ता प्रकरण न्यायप्रविष्ट; प्रशासनाकडून कार्यवाही सुरू, पर्यायी मार्गाची मागणी…!

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील शेतकरी मधुकर खरवडे यांनी त्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याबाबत केलेल्या अर्जासंदर्भातील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.

सदर प्रकरणात अर्ज प्रलंबित राहिल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळेत कार्यवाही झाली नसल्याची बाब शेतकऱ्यांकडून मांडण्यात आली आहे. तसेच, पर्यायी मार्गाबाबत सुचविण्यात आलेल्या पर्यायांवर अंतिम निर्णय न झाल्याने अडचणी कायम असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांतून नमूद केले आहे.

न्याय मिळावा या उद्देशाने शेतकरी मधुकर खरवडे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे निवेदन संपूर्ण दस्तऐवज सादर केले. संबंधित प्रकरणावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची बाब त्यांनी मांडली असून, योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात तहसीलदार राजेश भांडारकर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे स्पष्ट केले. तसेच, संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे व संयम राखण्याचे मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणीकृत कागदपत्रे सादर केली असून, पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे. शेती हंगामात रस्ता उपलब्ध असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

राज्यात शेतरस्त्यांच्या संदर्भात शासनाकडून आवश्यक ते निर्देश देण्यात आले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर प्रकरणात संबंधित प्रशासनाकडून नियमानुसार कार्यवाही करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!