घाट बंद, पण तस्करी सुरूच! जेना घाटावर कोणाचे संरक्षण? प्रशासन गप्प का?
चंद्रपूर, न्यूज डेस्क✍️
माजरी प्रतिनिधी,
भद्रावती तालुक्यातील वर्धा नदीपात्रातील बंद घोषित करण्यात आलेल्या जेना घाटातूनच अवैध रेती तस्करीचा मोठा खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने बंदी घातलेल्या या घाटातून दिवस-रात्र बिनधास्तपणे रेतीचा उपसा व वाहतूक सुरू असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे स्थानिक पत्रकारांकडून माहीती प्राप्त होत आहेत
माजरी परिसरातील जेना घाट, राळेगाव, मणगाव, पाटाळा या भागांतून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा होत असल्याचे दिसून येते. मात्र यामध्ये बंद असलेला जेना घाट तस्करांचा मुख्य अड्डा बनला असून, कोणतीही भीती न बाळगता मुख्य मार्गांवरून खुलेआम रेती वाहतूक केली जात आहे.
निगरानी पथक हटवले… कोणाच्या फायद्यासाठी?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वीच्या तहसीलदारांनी रेती तस्करी रोखण्यासाठी स्थायी निगरानी पथक उभे केले होते. मात्र सध्याच्या कार्यकाळात हे पथक बंद झाल्याची चर्चा आहे.
हे पथक का बंद करण्यात आले? आणि कोणाच्या दबावाखाली?
या प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत.
तहसील कार्यालयात संशयास्पद वर्दळ?
स्थानिक स्तरावर अशी माहिती पुढे येत आहे की, अवैध रेती उत्खननाशी संबंधित काही व्यक्तींची तहसील कार्यालयात नियमित ये-जा दिसून येत आहे. यामुळे या संपूर्ण साखळीमागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
घरकुल लाभार्थ्यांची कोंडी पण बघा..!
पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या तयार असूनही अनेकांना अद्याप रेती मिळालेली नाही, अशी तक्रार समोर आली आहे. दुसरीकडे अवैध रेती मात्र बाजारात सहज उपलब्ध असल्याने
घरकुल योजनेत मोठा घोळ तर नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.
पिपरी घाटातून रेती आणण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च येत असल्याने गरीब लाभार्थी हतबल झाले आहेत.
तस्कर मालामाल, शासनाचा महसूल बुडतोय..!
तालुक्यातील शासकीय व खासगी बांधकामांमध्ये अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. अनेक बांधकाम ठिकाणी अवैध रेतीचे साठे उघडपणे दिसत असून, पर्यावरणीय ऱ्हासही वाढत आहे.
आवाज उठवणाऱ्यांवर दबाव?
स्थानिक नागरिक व सूत्रांच्या माहितीनुसार, अवैध रेती उत्खननाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना काही अज्ञात व्यक्तींकडून दबाव टाकण्याचे व धमकावण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनावर मूक संमतीचा आरोप होत आहेत…
बंद घाटातून तस्करी सुरू असताना कारवाईचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
“तस्करांना मूक संमती आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात असून, प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मंडळ अधिकाऱ्यांची टाळाटाळ करतो तरी…
पिपरी घाटाबाबत माहिती घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलल्याने माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याचे दिसून आले.
तहसीलदारांचे स्पष्टीकरण..बघा..
भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी सांगितले की,
“अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी संबंधित अधिकारी व पोलीस यांची बैठक घेण्यात आली आहे. कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले असून, कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.”
कठोर कारवाईची मागणी..होत, आहेत…
भद्रावती तालुक्यात वाढत्या रेती तस्करीमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून,
बंद जेना घाटावर तात्काळ नियंत्रण
निगरानी पथक पुन्हा सुरू करणे
तस्करांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करणे
अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
पुढील भागात…
रेती तस्करीच्या या साखळीतील पुढील कड्या, संबंधितांचे संबंध आणि महत्त्वाचे पुरावे पुढील भागात उघड होणार आहेत…


