“लाच मागितल्यास निर्भयपणे तक्रार करा”; ACB उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांचे आवाहन
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare;95 25 61 25 55
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चंद्रपूर येथे नवनियुक्त उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या अनिल जिट्टावार यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिट्टावार यांना शुभेच्छा देत भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी प्रभावी कार्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच नागरिकांनी लाचखोरी अथवा भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींसाठी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही शासकीय कामासाठी पैसे, भेटवस्तू किंवा अन्य स्वरूपात लाभ मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले. तसेच अधिक माहितीसाठी उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्याशी 9823270581 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टीने शासकीय काम लवकर करण्यासाठी पैसे मागणे, परवाने किंवा मंजुरीसाठी रक्कम घेणे, बिल पास करण्यासाठी टक्केवारी मागणे, “चहा-पाणी”च्या नावाखाली पैसे उकळणे, कंत्राट मंजुरीसाठी कमिशन मागणे आदी प्रकार हे लाचखोरीच्या कक्षेत येतात.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात, राजुरा तालुकाध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष वहाब अली सय्यद तसेच नागभीड तालुकाध्यक्ष यशवंत निकुरे उपस्थित होते.
नवनियुक्त उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत जनतेच्या सहकार्याने भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टीने सामान्यत; आढळणारे काही लाचखोरीचे प्रकार
शासकीय काम लवकर करण्यासाठी पैसे मागणे
मंजुरी, परवानगी किंवा परवाना देण्यासाठी रक्कम मागणे
बिल, अनुदान किंवा पेमेंट पास करण्यासाठी टक्केवारी मागणे
पोलीस कारवाई टाळण्यासाठी पैसे घेणे
महसूल, तलाठी, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कामात लाच मागणे
नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणे
कंत्राट, टेंडर किंवा पुरवठा मंजुरीसाठी कमिशन मागणे
शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पैशांची मागणी करणे
चुकीचे काम करून देण्यासाठी अथवा गुन्हा दडपण्यासाठी पैसे घेणे
तपास, पंचनामा किंवा अहवाल आपल्या बाजूने देण्यासाठी लाभ मागणे
फाईल पुढे सरकवण्यासाठी “चहा-पाणी”, “सेवा शुल्क” अशा नावाखाली पैसे मागणे
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना भेटवस्तू, सोनं, महागड्या वस्तू किंवा इतर लाभ देणे/घेणे
अशा प्रकारची मागणी झाल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.


