Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedवरोऱ्यात आज आमदार करण देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालय व भाजप कार्यालयाचे उद्घाटन

वरोऱ्यात आज आमदार करण देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालय व भाजप कार्यालयाचे उद्घाटन

वरोऱ्यात आज आमदार करण देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालय व भाजप कार्यालयाचे उद्घाटन

वरोरा, न्यूज डेस्क ✍️

वरोरा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सुविधा व लोकहिताची कामे अधिक प्रभावीपणे आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार करण संजय देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासह भारतीय जनता पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज (शनिवार, ४ जुलै) सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा उद्घाटन सोहळा सहकार महर्षी दादासाहेब देवतळे जिनिंग प्रेसिंग सोसायटी, एलआयसी कार्यालयासमोर, वरोरा येथे पार पडणार असून, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा राहणार असून, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवरावजी भोंगळे तसेच विधान परिषद आमदार अरुण लखानी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच वरोरा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!