Tuesday, July 28, 2026
Homeभद्रावतीसब्जी मंडी बनली जुगार मंडी; भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सब्जी मंडी बनली जुगार मंडी; भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सब्जी मंडी बनली जुगार मंडी; भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मध्यरात्रीच्या छाप्यात ९ जण रंगेहात ताब्यात; ३ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील नवीन सब्जी मंडी परिसरात मध्यरात्री रंगलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धाडसी कारवाई करत नऊ जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत ५ मोटारसायकली, ८ मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹३ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दिनांक १४ जुलै २०२६ रोजी रात्री मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार नवीन सब्जी मंडी, भद्रावती येथे काही जण पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईत राजू धनराज कनोजे, सुरज चंदुलाल सोनवने, सोनू सुरेश शेंडे, मंगेश शेषराव खंडाळकर, राहुल रमेश हटकर, रवि शालीकराव विधाते, शुभम मधुकर पचारे, योगेश वसंतराव शिंदे आणि अनिल गणपत निंबाळकर या नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.

आरोपींच्या अंगझडतीदरम्यान व घटनास्थळाच्या पंचनाम्यात ५ मोटारसायकली, ८ मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८३/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहायक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, गोपाल आतकुलवार तसेच पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड आणि अंकुश खंडाळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

भद्रावती पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर जुगार अड्डे चालविणाऱ्यांना कडक इशारा मिळाला असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!