भद्रावतीच्या विकासासाठी नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी यांची मुंबईत धडाडी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले जनहिताचे प्रश्न
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare, 95 25 61 25 55
भद्रावती नगरपरिषद हद्दीतील विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, या उद्देशाने भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भद्रावती व वरोरा परिसरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या अपेक्षांनुसार विकासकामांना गती देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची मागणी नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी यांनी केली.
यावेळी शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जिवतोडे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आगामी नियोजन, कार्यकर्त्यांची भूमिका आणि जनसंपर्क अभियानाबाबत आपली भूमिका मांडली.
या प्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री आशिषदादा जयस्वाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी यांच्या पुढाकारामुळे भद्रावतीच्या विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


