Thursday, July 30, 2026
Homeभद्रावतीभद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला दारूतस्करीचा प्रयत्न; चालक फरार

भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला दारूतस्करीचा प्रयत्न; चालक फरार

भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई ; ८ लाख ३६ हजारांचा विदेशी दारूसाठासह, कार जप्त, 

नाकाबंदी तोडून स्विफ्ट कारसह पळ काढला; घोडपेठ येथे कार टाकून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

Shankar Borghare,  95 25 61 25 55

भद्रावती पोलिसांनी अवैध विदेशी दारूच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ८ लाख ३६ हजार ७६८ किमतीचा विदेशी दारूसाठा आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार जप्त केली. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने घोडपेठ परिसरात कार सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी पहाटे नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट ZDI (क्र. MH-04-HF-1208) या कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भद्रावती टप्पा परिसरात नाकाबंदी केली.

नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहताच चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने चंद्रपूरच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान चालकाने मौजा घोडपेठ गावातील वस्तीच्या दिशेने कार वळवून शंकर हेअर सलून समोर वाहन सोडले आणि अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमधून ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १,७२८ निप (३६ बॉक्स) किंमत २ लाख ९५ हजार ४८८ रुपये तसेच ९० मिलीच्या ४८० निप (५ बॉक्स) किंमत ४१ हजार २८० रुपये असा एकूण ३ लाख ३६ हजार ७६८ रूपये किमतीचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच ५ लाख किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण  ८ लाख ३६ हजार ७६८ रपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळीचा तपासही पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. संतोष केदार, पो.उप.नि. गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टुनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे व संतोष राठोड यांनी केली

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!