आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत फळवाटपाचा सामाजिक उपक्रम
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
महाराष्ट्राचे लोकनेते तथा माजी सांस्कृतिक मंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै २०२६ रोजी भद्रावती येथे फळवाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्ण आणि विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमानुसार सकाळी ११ वाजता भद्रावती येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मतिमंद विद्यालय, मंजूषा ले-आऊट, भद्रावती येथे विद्यार्थ्यांना फळांचे वितरण करण्यात येईल.
या सामाजिक उपक्रमात भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असून, वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांनी केले आहे.


