Saturday, September 5, 2026
Homeभद्रावती"भद्रावतीत चोरांची हवा टाईट! डी.बी. पथकानं ६ चोरीच्या दुचाकींसह केला खेळ खल्लास!"

“भद्रावतीत चोरांची हवा टाईट! डी.बी. पथकानं ६ चोरीच्या दुचाकींसह केला खेळ खल्लास!”

भद्रावती डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन विधीसंघर्ष बालकांकडून ६ चोरीच्या दुचाकी जप्त, २ लाख २० हजार रुपयांपर्यंत मुद्देमाल हस्तगत

 

✍️ शंकर बोरघरे

भद्रावती न्यूज डेस्क

मो. 95256 12555

 

भद्रावती. ..शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा भद्रावती पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वी उलगडा केला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, आणखी एका विधीसंघर्ष बालकाच्या साथीने भद्रावती व आजूबाजूच्या परिसरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

     पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीच्या सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. त्यामध्ये MH-34-C-9024 (₹30 हजार), MH-34-CC-4570 (₹80 हजार), MH-34-N-2773 (₹20 हजार), MH-34-BL-5130 (₹30 हजार), MH-34-V-8128 (₹30 हजार) आणि MH-34-S-8539 (₹30 हजार) या वाहनांचा समावेश असून, एकूण ₹2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त वाहनांचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

      या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 724/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

        ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (वरोरा) संतोष बाकल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात ..

        सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सफौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड तसेच भद्रावती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

डी.बी. पथकाच्या या कारवाईमुळे भद्रावती शहरातील दुचाकी चोरीच्या मालिकेचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लागल्याने वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!