Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरहनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांचा दणका; ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल...

हनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांचा दणका; ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

हनुमान टेकडीवरील जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांचा दणका; ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

५२ पानी जुगारावर धाड; सहा जणांवर गुन्हा दाखल, रोकड, मोबाईलसह पाच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

नागभीड न्यूज डेस्क ✍️ यशवंत निकुरे

नागभीड : मौजा कान्पा येथील हनुमान टेकडी परिसरात सुरू असलेल्या ५२ पानी जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांनी धाड टाकत अवैध जुगाराचा पर्दाफाश केला. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सहा जणांवर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असून, ३ लाख ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कान्पा येथील टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरात ५२ पानी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती नागभीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने परिसरात धाड टाकली. यावेळी पैशांची बाजी लावून हार-जीतीचा जुगार खेळताना सहा जण पोलिसांच्या हाती लागले.

कारवाईत दिपक गंगाधर करुटकर (३७), लक्ष्मण नेमाजी गोंगल (३५), जगदिश दादाजी भुरसे (४९), सुधाकर पांडुरंग मुळे (४७), दामोदर वासुदेव घ्यार (६६) आणि नितेश बाळकृष्ण मलोडे (३०) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी जुगाराच्या डावावरील ९०० रुपये, आरोपी क्र. १ ते ५ यांच्या अंगझडतीतील ६ हजार १० रुपये, घटनास्थळावरून ६ मोबाईल फोन किंमत ४१ हजार रुपये तसेच ५ मोटारसायकली किंमत ३ लाख ३० हजार रुपये, असा एकूण ३ लाख ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांच्या कारवाईने जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ

हनुमान मंदिर परिसरासारख्या ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर तसेच नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस अंमलदार जितेंद्र मारबते आणि शुभम वनकर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

नागभीड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांना चांगलाच दणका बसला असून, अशा अवैध प्रकारांविरोधात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!