Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरम्हसली शंकरपट परिसरात जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांची धाड!

म्हसली शंकरपट परिसरात जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांची धाड!

म्हसली शंकरपट परिसरात जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांची धाड!

१० जणांवर कारवाई; ५२ पत्त्यांसह रोख रक्कम असा १६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागभीड, न्यूज डेस्क – यशवंत निकुरे

नागभीड तालुक्यातील मौजा म्हसली येथील शंकरपटाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांनी धाड टाकून १० जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसली शंकरपट परिसरात ५२ पत्त्यांच्या साहाय्याने जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जुगार खेळताना आढळून आलेल्या १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये आशिष अभिमान मेश्राम (वय ४२, रा. पाहर्णी, ता. नागभीड), हिवरसिंग गुरूचरणसिंग जुनी (वय २९, रा. जांभुळघाट, ता. चिमूर), सुनील हरि नारनवरे (वय ३०, रा. पाहर्णी, ता. नागभीड), नितेश गुरुदेव मानकर (वय ३०, रा. शंकरपूर, ता. चिमूर), शरद शामराव रामटेके (वय ५२, रा. पाहर्णी, ता. नागभीड), स्वप्नील कार्तिक अलोने (वय २९, रा. शिवनी, ता. सिंदेवाही), गिरीधर तुकाराम उंबरकर (वय ४९, रा. ढोरपा, ता. नागभीड), नरेश उरकुडा खोब्रागडे (वय ४८, रा. रामाळा, ता. सिंदेवाही), संदीप मारोती मुंगमोडे (वय ३५, रा. उटीमाल, ता. सिंदेवाही) आणि आकाश पारखी (वय ३०, रा. विलम, ता. नागभीड) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान ५२ पत्ते व रोख १ हजार २७० रुपये, तसेच आरोपी क्रमांक १ ते ९ यांच्या अंगझडतीतून १५ हजार रुपये, अशी एकूण १६ हजार २७० रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले.

पत्त्यांचा डाव रंगात असतानाच पोलिसांची धाड पडल्याने जुगार खेळणाऱ्यांचा डाव फिस्कटला. शंकरपटाच्या परिसरात बैलांच्या शर्यतीसोबत पत्त्यांचा ‘डाव’ रंगविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा लगाम लावल्याचे या कारवाईतून दिसून आले.

संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचे नेतृत्वात नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, पोलीस उपनिरीक्षक भोजराम लांजेवार, पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस अंमलदार विलास बालमवार आणि विक्रम आत्राम यांच्या पथकाने सहभाग घेतला.

नागभीड पोलिसांच्या या कारवाईमुळे म्हसली शंकरपट परिसरातील अवैध जुगारावर लगाम बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!