Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीखर्रा शौकिनांची चिंता वाढली; ‘भद्रावतीचा फेमस खर्रा’ आता इतिहासात जमा होणार का?

खर्रा शौकिनांची चिंता वाढली; ‘भद्रावतीचा फेमस खर्रा’ आता इतिहासात जमा होणार का?

 बसने पुण्यापर्यंत जाणारा खर्रा आता टपरीवरही सापडेना; शौकिनांची शोधमोहीम सुरू!

खर्रा शौकिनांची चिंता; टपऱ्या उभ्या, पण खर्र्याचा डबा गायब!

भद्रावतीचा खर्रा म्हणजे एकेकाळी भद्रावतीची चालती-बोलती ओळख! एवढी ‘फेमस’ की भद्रावती बसस्थानकावरून खासगी बस बाहेर पडायची, तेव्हा प्रवाशांसोबत भद्रावतीचा खर्राही ‘प्रवासाला’ निघायचा!

पुण्यासारख्या दूरच्या शहरांपर्यंत त्याची ‘फेम’ पोहोचली होती. बाहेरगावच्या टपऱ्यांवर तर चक्क….!

‘भद्रावतीचा फेमस खर्रा’

असे फलक लावलेले दिसायचे.

पण आता काळ बदलला!

एके दिवशी तात्या जुन्या टपरीवर गेले.

तात्या .. “भाऊ, एक भद्रावतीचा फेमस खर्रा दे!”

टपरीवाला डबा उघडतो… आत काहीच नाही!

दुसरा डबा उघडतो… त्यात चॉकलेट!

तिसरा डबा उघडतो… गोळ्या!

तात्या घाबरून म्हणतात—

“अरे देवा! खर्र्याला काय झालं? की तोही ‘स्वेच्छानिवृत्ती’ घेऊन गेला?”

टपरीवाला म्हणतो

“तात्या, खर्रा आता इतका दुर्मीळ झालाय की शोधायला निघालात तर टपरीपेक्षा आधी आठवणी सापडतात!”

तात्या आजूबाजूला पाहत म्हणतात

“पूर्वी इथून खर्रा पुण्याला जायचा… आता पुण्याला गेल्यावर तिथे भद्रावतीचा खर्रा शोधायचा!”

तेवढ्यात चिंटू चॉकलेट घेण्यासाठी येतो.

चिंटू : “काका, खर्रा म्हणजे काय?”

तात्या छातीवर हात ठेवून म्हणतात

“बाळा… हा प्रश्न ऐकून आमच्या पिढीच्या डोळ्यात पाणी आलं!”

टपरीवाला हसत म्हणतो

“काळ बदलला तात्या. पूर्वी मोठी माणसं खर्रा घ्यायची; आता मुलं चॉकलेट घेतात!”

तात्या म्हणतात

“म्हणजे खर्र्याची जागा चॉकलेटने घेतली?”

टपरीवाला … “हो!”

तात्या … “मग पुढच्या पिढीला भद्रावतीचा खर्रा सांगितला तर?”

टपरीवाला … “कथा सांगावी लागेल!”

तात्या … “फोटो आहे?”

टपरीवाला … “नाही!”

तात्या … “फलक आहे?”

टपरीवाला … “नाही!”

तात्या …“मग पुरावा?”

टपरीवाला हसत म्हणतो

“तात्या, तुमच्या आठवणीच आता पुरावा!”

तात्या टपरीकडे बघून म्हणतात

“काय दिवस आले! पूर्वी खर्रा बसने पुण्यापर्यंत प्रवास करायचा; आता त्याची आठवणच मनातून बाहेर पडायला तयार नाही!”

खर्रा शौकिन मात्र चिंतेत

“टपऱ्या उभ्या आहेत, ग्राहक आहेत, आठवणी आहेत… पण खर्रा कुठे आहे?”

आणि शेवटी भद्रावतीच्या जुन्या टपरीसमोर एक अदृश्य फलक लटकताना दिसतो

‘येथे पूर्वी भद्रावतीचा फेमस खर्रा मिळत होता… सध्या फक्त आठवणी उपलब्ध!’

गेल्या त्या आळवणीप्रमाणे…
आता गेले ते खर्रा,
राहिल्या त्या आठवणी!

“जुन्या खर्र्याच्या आठवणी जपणाऱ्यांनी राग मानून घेऊ नये; हा खर्र्याविरोधातला टोला नाही, तर भद्रावतीच्या एका जुन्या ओळखीची आठवण आहे. खर्रा आज टपरीवर दिसत नसला, तरी त्याची चव आणि त्याच्या आठवणी मात्र अजूनही अनेकांच्या मनात ताज्याच आहेत!”

टीप : प्रस्तुत लेखन हे पूर्णतः काल्पनिक, विनोदी व व्यंगात्मक स्वरूपातील कथानक असून, यातील पात्रे, प्रसंग व संवाद हे केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने रचलेले आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था, व्यवसाय किंवा घटनेशी याचा थेट संबंध जोडण्याचा हेतू नाही. कोणाच्याही भावना दुखावणे, बदनामी करणे किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी गैरसमज निर्माण करणे हा या लेखाचा उद्देश नाही. जुन्या खर्र्याच्या आठवणी जपणाऱ्या सर्वांनी हा मजकूर केवळ विनोदी कथानक म्हणून घ्यावा.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!