Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीखेत्रे साहेबांचा दणका कायम! गजानन नगरात घरातून गांजा जप्त

खेत्रे साहेबांचा दणका कायम! गजानन नगरात घरातून गांजा जप्त

पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांचा दणका; पलंगामागे लपवलेला गांजाही पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही!

गजानन नगरात १ किलो ४७ ग्रॅम गांजा जप्त; २२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू असतानाच पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांनी गजानन नगर परिसरात कारवाई केली. या कारवाईत राहत्या घरातून १ किलो ४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजा व मोबाईल असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन नगर परिसरात गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांच्या पथकाने संबंधित घराची झडती घेतली.

घरातील भिंतीच्या छतावर आडोशाला प्लास्टिक पिशवी आढळून आली. पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश अमली पदार्थ आढळला. पंचांसमक्ष वजन केले असता त्याचे वजन १ किलो ४७ ग्रॅम भरले.

या कारवाईत आयुष देवानंद नरवाडे (वय २२) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. जप्त गांजाची किंमत १२ हजार रुपये, तर मोबाईलची किंमत १० हजार रुपये, असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘गुप्त’ जागाही पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही!

गांजा घराचा छतावर लपवून ठेवला असला तरी पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घेतलेल्या झडतीत हा साठा अखेर सापडलाच. त्यामुळे ‘लपवले की सापडणार नाही’ असा अंदाज पोलिसांच्या कारवाईसमोर फोल ठरला.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र देविदास केदारे, पोलीस हवालदार कोरासे, पोलीस हवालदार विजय उपरे, पोलीस शिपाई प्रेमकुमार बावणकर आणि मपोशी करिश्मा सहभागी होते.

याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(२)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र देविदास केदारे करीत आहेत.

पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे भद्रावती परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धावपळ उडाल्याचे चित्र आहे.

टीप :- सदर वृत्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. प्रकरणातील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!