Sunday, September 13, 2026
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचा जिल्ह्यात संघटन विस्ताराचा निर्धार”

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचा जिल्ह्यात संघटन विस्ताराचा निर्धार”

पत्रकार संघाची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनात्मक विस्तारावर भर; पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️, 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पत्रकार संघटनेच्या जिल्ह्यातील आगामी वाटचालीचा आढावा घेताना संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच सर्व तालुक्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेले बदल, पत्रकारांसमोरील विविध अडचणी आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न याबाबत पदाधिकारी व सदस्यांनी आपली   मते मांडली. पत्रकारांच्या न्याय्य प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडणे, शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी सक्षमपणे भूमिका मांडणे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

      जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, तालुकास्तरावरील पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय वाढविणे, नियमित बैठका घेणे आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार हिताचे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. बदलत्या काळाची गरज लक्षात घेता डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांनाही संघटनेच्या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीला राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके, ज्येष्ठ पत्रकार तथा राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया ॲड. राहुल थोरात, सरचिटणीस केवलसिंग जुनी, जिल्हा संघटक तथा सिंदेवाही तालुका अध्यक्ष वाहब अली सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सतीश राजूरवार, संजय अगडे, संतोष शिवणकर, यशवंत निकुरे, विलास मोहिनकर, लोकेश पारखी, सुनील हिंगणकर, राजेंद्र वाढई, विनोद वांढरे, प्रकाश चलाख, दिवाकर कामडी यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

बैठकीत केवळ संघटनेच्या कामकाजाचा आढावा न घेता आगामी काळातील दिशा, धोरण आणि कार्यपद्धती यावरही सखोल विचारमंथन करण्यात आले. पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने भूमिका घेणे, आवश्यकतेनुसार संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे आणि पत्रकारांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून ठोसपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

     पत्रकारांची एकजूट, संघटनेची ताकद आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण संघर्ष या भूमिकेतून जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेची उपस्थिती अधिक मजबूत करून पत्रकारांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार पदाधिकारी व सदस्यांनी व्यक्त केला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!