Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीट्रॅक्टर पकडला; रेतीच्या खेळाचा ‘सूत्रधार’ कोण? प्रकाश खिलोशिया यांचे नाव समोर!

ट्रॅक्टर पकडला; रेतीच्या खेळाचा ‘सूत्रधार’ कोण? प्रकाश खिलोशिया यांचे नाव समोर!

ट्रॅक्टर पकडला; रेतीच्या खेळाचा ‘सूत्रधार’ कोण? प्रकाश खिलोशिया यांचे नाव समोर!

फुकट नगरात विनारॉयल्टी रेती वाहतूक उघड; विना नंबर ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

भद्रावती, न्यूज डेस्क✍️

शंकर बोरघरे 95 52 61 25 55 

भद्रावती तालुक्यात विनापरवाना व विनारॉयल्टी रेती वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. फुकट नगर परिसरात विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत स्वराज ७३५ ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान चालकाच्या चौकशीत प्रकाश खिलोशिया यांचे नाव समोर आले आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि ११ ऑक्टोबर रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून फुकट नगर परिसरात विना नंबरचा ट्रॅक्टर विनारॉयल्टी रेती घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना माहिती देऊन पोलिस पथक फुकट नगरकडे रवाना झाले.

हनुमान मंदिर परिसर ओलांडल्यानंतर गोळीबार चौकाच्या दिशेने येणारा शेंदऱ्या रंगाचा स्वराज ७३५ विना नंबरचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली नंबर नसलेली ट्रॉली पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव विजय छन्ना जांगळे (वय २५, रा. केसुर्ली, ता. भद्रावती) असे सांगितले.

ट्रॉलीची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती आढळून आली. रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता आपल्याकडे कोणताही परवाना नसल्याचे चालकाने सांगितल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत. 

चौकशीत प्रकाश खिलोशिया यांचे नाव समोर…

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विजय जांगळे याने सदर ट्रॅक्टर व ट्रॉली प्रकाश खिलोशिया, रा. मुजुषा लेआउट, भद्रावती यांच्या मालकीची असल्याचे सांगितल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे. तसेच, किल्ला वॉर्डमधील स्टॉकवरून रेती भरून फुकट नगर येथील गोळीबार चौकात खाली करण्यासाठी आपल्याला पाठविण्यात आल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता रेतीचा कथित स्टॉक नेमका कुठे आहे? त्याचा परवाना आहे का? रेती कोठून आणली आणि कुठे नेली जात होती? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ४ लाख रुपये, ट्रॉलीची १ लाख ५० हजार रुपये आणि एक ब्रास रेतीची अंदाजे किंमत ८ हजार रुपये, असा एकूण ५ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत.

या प्रकरणी विजय छन्ना जांगळे आणि प्रकाश खिलोशिया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४८(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

खेत्रे साहेबांचा  मार्गदर्शनात कारवाई…

पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर व योगेश यांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे विनारॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणातील कथित रेती स्टॉकचीही चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पोलिस सूत्रांकडून मीळालेल्या माहितीनुसार  आरोपांची पुढील तपासातून सत्यता स्पष्ट होणार असून, संबंधितांना दोषी ठरविण्याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होईल.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!