Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीपूर्वी कारवाई, तरी खर्रा विक्रीचा प्रश्न कायम? ‘तरुण सिंघम’ पोलीस अधिकारी सचिन...

पूर्वी कारवाई, तरी खर्रा विक्रीचा प्रश्न कायम? ‘तरुण सिंघम’ पोलीस अधिकारी सचिन खेत्रे साहेबांचा दणका! १ लाख ७२ हजार मुद्देमाल जप्त; कारवाईनंतर चर्चेला उधाण

भद्रावतीचा ‘तरुण सिंघम अधीकारी सचिन खेत्रे साहेब  पुन्हा’ ॲक्शन मोडमध्ये! प्रतिबंधित खर्रा व्यवसायाला पोलिसांचा दणका; १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम नगरात धडक कारवाई; बसस्थानक परिसरातील खर्रा विक्रीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत, पूर्वीच्या कारवाईनंतरही नियंत्रणाचा प्रश्न!

भद्रावती, न्यूज डेस्क, 

शंकर बोरघरे 95 52 61 25 55 

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत गौतम नगरातून तब्बल १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे अवैध खर्रा व्यवसायाविरोधात पोलिसांनी ठोस पाऊल उचलले आहे. घटनास्थळी तीन जण खर्रा तयार करताना आढळले, तर घरमालक अतुल कोल्हे हा कारवाईच्या वेळी उपस्थित नसून फरार असल्याची माहिती आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान गौतम नगरातील अतुल कोल्हे याच्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता अनिकेत विनोद डोंगरे (वय २३, रा. हनुमान नगर, पांडव वार्ड), दीपक सुनील कुसनाके (वय २५, रा. पिपरबोडी) आणि यश मारोती दुपारे (वय १९, रा. चंडिका वार्ड) हे तंबाखू, चुना आणि सुपारी मिसळून खर्रा तयार करताना आढळले.

पोलिसांनी १ लाख ५३ हजार ६०० रुपयांची सुगंधित तंबाखू, १२ हजार रुपयांची ४० किलो खर्रा सुपारी, २ हजार ४२० रुपयांचे व्ही-१ किंग पॅक तंबाखू, ३ हजार ३६६ रुपयांचा विमल पानमसाला, ५०० रुपयांचा चुना आणि २०० रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या असा एकूण १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्याचे नमुने सीलबंद करून रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

मात्र, भद्रावतीतील प्रतिबंधित खर्रा विक्रीचा प्रश्न केवळ गौतम नगरापुरता मर्यादित आहे का? बसस्थानकासमोरील एका पानटपरीवरील खर्रा विक्रीचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. मागील वर्षी राज्य अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्याकडूनही कारवाई झाल्याची माहिती आहे. तरीही अशा विक्रीवर कायमस्वरूपी नियंत्रण आले का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

बसस्थानकासमोर नागपूर आणि पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसगाड्या प्रवाशांसाठी उभ्या राहत असल्याने परिसरात मोठी वर्दळ असते. संबंधित पानटपरीवर खर्रा घेण्यासाठी प्रवासी येत असल्याची स्थानिक चर्चा आहे. येथून खर्रा बाहेरगावी जात असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, या कथित पुरवठ्याची व्याप्ती आणि त्यातील सत्य अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणांनी या परिसरातील विक्रीची वस्तुस्थिती तपासून नियमांनुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘तरुण सिंघम पोलीस अधीकारी सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील कारवाईचे स्वागत; पण अवैध व्यवसायाच्या मुळापर्यंत तपास पोहोचणेही गरजेचे! प्रतिबंधित तंबाखूचा पुरवठा कुठून होतो, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि पूर्वी कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा विक्री होत असल्यास ती रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याची उत्तरे मिळाली पाहिजेत. केवळ छापे आणि मुद्देमाल जप्तीपुरते न थांबता अवैध व्यवसायाला कायमचा आळा घालण्यासाठी पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने समन्वयाने कारवाई करणे आवश्यक आहे.

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक पेतरस सिडाम यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलीस हवालदार विजय तलांडे, भारत पुसांडे, प्रेमकुमार बावनकर, शंकर घुगे, किरण चांदणे, महिला पोलीस शिपाई रागिनी रायपुरे आणि अदिबा यांनी सहभाग घेतला.

भद्रावती शहरात प्रतिबंधित तंबाखूची विक्री किंवा अन्य अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. तातडीच्या पोलीस मदतीसाठी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांची धडक कारवाई स्वागतार्ह; आता अवैध खर्रा विक्रीला कायमचा आळा बसणार का? याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!