चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
मुल (प्रतिनिधी, जुबेद शेख)
नुकताच दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या यशामध्ये कुमारी अवनी सुहास पुपलवार हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल 97.60 टक्के गुण मिळवून उज्वल यशाची नोंद केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देत तसेच पेढे भरवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सन्मान सोहळ्यास भाजप मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, भाजप नेत्या सौ. किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. प्राची आक्केवार, सौ. अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे, आनंद आक्केवार तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी नगरसेविका सौ. प्राची आक्केवार यांनी संविधानाची प्रत भेट देत गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून त्यांच्या यशाचा अभिमान संपूर्ण तालुक्याला वाटत आहे.


