Friday, September 11, 2026
Homeचंद्रपूरधारदार लेखणीचा सन्मान; सुनील गेडाम यांच्याकडे NJA चंद्रपूर जिल्ह्याची धुरा!

धारदार लेखणीचा सन्मान; सुनील गेडाम यांच्याकडे NJA चंद्रपूर जिल्ह्याची धुरा!

NJA च्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निर्भीड पत्रकार सुनील गेडाम यांची निवड!

धारदार लेखणी, रोखठोक पत्रकारिता आणि जनहितासाठी निर्भीड लढा; NJA कडून मोठी जबाबदारी

चंद्रपूर , न्यूज डेस्क : Shankar Borghare | 9552612555

कोणत्याही राजकीय, प्रशासकीय अथवा इतर दबावाला बळी न पडता आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे पत्रकार सुनील विठ्ठल गेडाम यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) च्या चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय मान्यताप्राप्त ‘दैनिक वादळ वार्ता’ या वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले सुनील गेडाम यांनी आपल्या रोखठोक, निर्भीड आणि जनहितवादी पत्रकारितेमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. प्रशासनातील गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहेत.

गडचिरोली जिल्हा आणि सिंदेवाही परिसरातील विविध प्रशासकीय प्रश्नांवर सुनील गेडाम यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. शासकीय रुग्णालयातील अत्यंत संवेदनशील शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) प्रक्रियेशी संबंधित कथित गैरप्रकार आणि प्रशासकीय अनागोंदी यासारख्या गंभीर विषयांवर त्यांनी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

ग्रामपातळीवरील प्रशासन, विविध शासकीय कामकाज आणि ग्रामसेवकांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या तक्रारी व कथित गैरप्रकारांवरही त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. त्यांच्या वृत्तमालिकांमुळे अनेक प्रश्न सार्वजनिक चर्चेत आले असून, संबंधित विषयांवर प्रशासनाला भूमिका स्पष्ट करावी लागल्याचेही दिसून आले.

पत्रकारिता ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून समाजातील प्रश्नांना आवाज देणे, जनहिताच्या मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारणे आणि सर्वसामान्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हीच खरी पत्रकाराची जबाबदारी असल्याची भूमिका सुनील गेडाम यांनी आपल्या कार्यातून सातत्याने अधोरेखित केली आहे.

कोणत्याही राजकीय अथवा प्रशासकीय दबावासमोर न झुकता जनहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून सुनील गेडाम यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या रोखठोक पत्रकारितेची आणि जनहितासाठी सातत्याने उचललेल्या आवाजाची दखल घेत न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

सुनील गेडाम यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार संघटनात्मक चळवळीला निर्भीड आणि लढवय्ये नेतृत्व मिळाल्याची भावना पत्रकार बांधवांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धारदार लेखणी… निर्भीड पत्रकारिता… जनहितासाठी रोखठोक आवाज… आणि आता NJA च्या चंद्रपूर जिल्हा नेतृत्वाची मोठी जबाबदारी सुनील गेडाम यांच्या खांद्यावर!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!