Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीतलवार घेऊन फिरणारा युवक..! पोलिसांच्या तावडीत.

तलवार घेऊन फिरणारा युवक..! पोलिसांच्या तावडीत.

भद्रावती (प्रतिनिधी) :- सुमठाना चौक परिसरात उघड्यावर तलवार घेऊन रस्त्यावर मिरवणाऱ्या एका युवकाचा शेवटी पोलिसांनी खेळ केला! भद्रावती गुन्हे शोध पथकाने धडक कारवाईत त्याला जेरबंद केले.
याशिवाय गोपनीय माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने अचानक छापा टाकला.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक हा प्रज्वल अशोक कोडापे नामक (वय 22, रा. शिवाजी नगर, भद्रावती) हा इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला. झडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी धारदार तलवार (किंमत अंदाजे १ हजार रुपये) जप्त करण्यात आली.
प्रसंगी शहरात तलवार घेऊन फिरण्याचा त्याचा ‘दादा’पणा पोलिसांनी क्षणार्धात संपवला! कोणत्याही क्षणी गंभीर घटना घडू शकणारा हा प्रकार पोलिसांनी आळा घालून रोखला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
कारवाईत उपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुणकर, विश्वनाथ चौधरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहित चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!