Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीनिवडणुकीनंतर कार्यकर्त्याची किंमत कुणाला माहित?

निवडणुकीनंतर कार्यकर्त्याची किंमत कुणाला माहित?

नेत्यांच्या गाड्या, माईक, सभा… पण कार्यकर्त्याला फोन नाही!

भद्रावती (प्रतीनीधी):-नगरपरिषद निवडणुकीचे मतदान आज संपले आणि भद्रावतीसह राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे. “कार्यकर्त्याची किंमत कोणाला माहित?” निवडणुकीच्या प्रचारात दिवस-रात्र घाम गाळणारा, चप्पल झिजवणारा, दरवाजे ठोठावणारा, “माझा उमेदवार… माझा बूथ… माझं काम!” म्हणत धावणारा कार्यकर्ता, आज निकालाच्या आधीच बाजूला पडला आहे. नेत्यांकडे गाड्या, माईक, सभा असतात, पण मतदारांपर्यंत पोहोचवणारा एकमेव चेहरा म्हणजे कार्यकर्ता. तो नसता तर कोणताही उमेदवार १० घरांतही जावू शकत नाही.
भद्रावतीत निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्ता ‘रियल हिरो’ म्हणून ओळखला जात होता. मतदान दिवशी तो ‘फुल पॉवर कॅप्टन’ होता.
पण मतदानानंतर त्याची स्थिती अशी झाली आहे की, त्याला फोन करून विचारणारा नेता नाही. त्याचा स्टेटस सीन आहे, पण रिप्लाय नाही.
काही कार्यकर्ते सरळ सांगतात, “मत मिळवताना आम्ही मी… मतदानानंतर मात्र मी त्यांचा कोणीच नाही!”
मतदार थेट बोलतोय, “तुम्ही जिंकलात तर श्रेय तुमचं… पण जनतेपर्यंत पोहोचवणं काम त्यांचं! कार्यकर्त्याची किंमत ओळखा… नाहीतर पुढच्या निवडणुकीत कार्यकर्ता नव्हे, उमेदवार गायब दिसेल!”
आज हेच जोरात बोलले जात आहे.
कार्यकर्ता नाही, तर सत्ता नाही! कार्यकर्त्याची किंमत नाही, तर विजय नाही!
प्रचारात रियल हिरो, मतदानानंतर बाजूला
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी अनेक दिवस घाम गाळला.
त्यांनी दरवाजे ठोठावले, घरोघरी जाऊन उमेदवारांची माहिती दिली, बूथपर्यंत मतदारांना आणले. पण मतदानानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नेत्यांच्या गाड्या, माईक, सभा यांच्या आड लपलेला कार्यकर्ता आज बाजूला पडला आहे.
भद्रावतीत अनेक कार्यकर्ते सांगतात, “आम्ही निवडणुकीसाठी दिवस-रात्र घाम गाळला, पण आता आमच्याकडे कोणी बोलत नाही.
आम्ही निवडणुकीचा कणा आहोत, पण निकालाच्या आधीच आमची किंमत ‘कॅन्सल टिकीट’सारखी झाली आहे.”
नेत्यांच्या गाड्या, माईक, सभा… पण कार्यकर्त्याला फोन नाही!
निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांच्या गाड्या, माईक, सभा यांच्या आड लपलेला कार्यकर्ता आज बाजूला पडला आहे. त्याला फोन करून विचारणारा नेता नाही. त्याचा स्टेटस सीन आहे, पण रिप्लाय नाही. काही कार्यकर्ते सरळ सांगतात, “मत मिळवताना आम्ही मी… मतदानानंतर मात्र मी त्यांचा कोणीच नाही!”
मतदारराजा थेट बोलतोय, “तुम्ही जिंकलात तर श्रेय तुमचं… पण जनतेपर्यंत पोहोचवणं काम त्यांचं! कार्यकर्त्याची किंमत ओळखा… नाहीतर पुढच्या निवडणुकीत कार्यकर्ता नव्हे, उमेदवार गायब दिसेल!”
कार्यकर्ता नाही, तर सत्ता नाही!
आज हेच जोरात बोलले जात आहे.
कार्यकर्ता नाही, तर सत्ता नाही! कार्यकर्त्याची किंमत नाही, तर विजय नाही! निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी अनेक दिवस घाम गाळला, पण मतदानानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेत्यांच्या गाड्या, माईक, सभा यांच्या आड लपलेला कार्यकर्ता आज बाजूला पडला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!