सहाय्यक सपांदक:- प्रमोद दुबे
५० रुपयांचा प्रेसकार्ड…
भाग३:-गाडी बदलली, जिल्हा बदलला… पण अक्ल मात्र तशीच!
चंद्रपूर शहरात सुरू असलेला हा पत्रकारितेचा तमाशा आता गावागावात पोहोचला आहे. पहिला भाग जेलचा, दुसरा भाग फोनचा आणि आता तिसरा भाग थेट गाडीचा आणि नकाराचा!
तेच चार झोलाशाप पत्रकार…
कधी दुचाकीवर बसून “पत्रकारगिरी”,
तर कधी चारचाकी कारमध्ये बसून “धडाका”.
लोक म्हणतात,
“अरे, हे बातमी करायला निघालेत की लग्नाची वरात काढलीये?”वणी तालुक्यात गावठी एन्ट्री..!
वणी तालुक्यात पोहोचताच पुन्हा तोच रेकॉर्ड ..!
छातीवर ५० रुपयांचा प्रेसकार्ड,
हातात मोबाईल,
आणि तोंडात एकच वाक्य..!“मी चंद्रपूरचा पत्रकार आहे!”
समोरचा माणूस आधी घाबरतो,
मग नीट बघतो,
आणि शेवटी हसतो.
पकडलं की लगेच पलटी
कोणी विचारलं,
“काल गडचिरोलीत नव्हतास का?”
“ही गाडी तुझीच ना?”
“हा फोन नंबर तुझाच ना?”
तेव्हा लगेच उत्तर..!
“तो मी नव्हेच!”
गाडी माझी नाही,
दुचाकी माझी नाही,
फोन माझा नाही,
आवाज माझा नाही,
आणि प्रेसकार्ड?
“तो तर कुणीही छापतो!”बातमी नाही, भंपकपणा भारी..!
या लोकांची पत्रकारिता म्हणजे..
घटना झाली की नाही, याचं काही देणंघेणं नाही.
सेल्फी आली पाहिजे,
स्टेटस टाकायचा,
आणि कॅप्शन..!
“खळबळ उडाली!”
खळबळ नाही,..!
पण लोकांच्या पोटात हसू नक्की उडतं.
जिल्हा बदला, तमाशा तोच..!
चंद्रपूर कंटाळला,
म्हणजे गडचिरोली.
तिथे लोक ओळखू लागले,
म्हणजे वणी.
उद्या ओळख वाढली,
तर पुढचा जिल्हा तयार!
जिल्हा बदलतो,
गाडी बदलते,
पण झोलपणा मात्र कायम!
नागरिक काय म्हणतात..?
गावातले लोक थेट बोलतायत
“हे पत्रकार नाहीत, फिरते जोकर आहेत!”
“५० रुपयांचा प्रेसकार्ड म्हणजे जादूची चावी वाटतं!”
“बातमी कमी, तमाशा जास्त!”
काहीजण तर म्हणतात
“सर्कसला तिकीट कशाला?
हे लोक रस्त्यावरच फुकट शो देतात!”
शेवटचा गावठी सीन..!
एकूण काय,
या महानाट्याचा भाग ३ संपलाय,
पण पुढचा भाग कुठे येईल,
कोणत्या गाडीवर येईल,
आणि ‘तो मी नव्हेच’ किती वेळा ऐकायला मिळेल…
हे सांगता येत नाही.
तोपर्यंत गावकऱ्यांचा सल्ला एकच..!
खरी बातमी पाहिजे असेल तर पेपर उघडा
आणि हसायचं असेल तर ५० रुपयांचा प्रेसकार्ड शोधा!भाग ४ मध्येच :-पंचनामा आणि पळापळ
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


