निवडणुकीनंतर…पंचवार्षिक उत्सव!
चंद्रपुर न्यूज डेस्क ✍️
प्रमोद दुबे..!वीर सावरकर नगर, उडिया मोहल्ला, रयतवारी कॉलरी आणि इंडस्ट्रियल एरिया या प्रभाग क्रमांक ६ मध्ये गेल्या पाच वर्षांत विकासाने पायही ठेवलेला नाही, अशी खात्रीशीर माहिती नागरिकांकडून मिळत आहे. येथे विकासकामे इतकी कमी झाली आहेत की, ती दुर्बिणीतूनही दिसत नाहीत.
पाणी येणार… येणारच… पण कधी?
महानगरपालिकेने वर्षांपूर्वी रस्ते खोदून मोठी पाईपलाईन टाकली. पाईप लाईन आहे, खड्डे आहेत, पण पाणी मात्र अजूनही वाटेतच अडकले आहे.
दोन वर्षांपूर्वी बांधलेली मोठी पाण्याची टाकी सध्या शोभेची वस्तू ठरली असून, फक्त रयतवारी कॉलरीलाच दर्शन देत आहे. बाकी भागात नागरिक पाण्याकडे पाहून तहान भागवतात.नाली आणि पाईपलाईन ; ‘स्टॉप’ मोडवर..!
नाली आणि पाईपलाईनची कामे इतकी ठप्प आहेत की, कामगारही वाट पाहून थकले असतील. अर्धवट नाल्या, साचलेले पाणी आणि दुर्गंधी..!
हेच इथले कायमस्वरूपी विकास मॉडेल बनले आहे.
टँकरराज…!
महानगरपालिकेची पाण्याची गाडी ३..४ दिवसाआड दर्शन देते. टाकी धुण्याचा कार्यक्रम महिन्या-दोन महिन्यांनी होतो. पाणी कुणाला मिळते, कुणाला नाही.
हे पूर्णपणे नशीबावर अवलंबून आहे. स्वच्छतेबाबत विचारायचे असेल तर, “पाणी आहे हेच मोठे” अशी भावना नागरिकांनी स्वीकारली आहे.नगरसेवकांचा पंचवार्षिक दौरा..!
स्थानिक नागरिक सांगतात की, नगरसेवक पाच वर्षांत फक्त एकदाच दिसतात…!
तेही निवडणुकीच्या वेळी. हात जोडून, दार ठोठावून मते मागितली जातात. निवडणूक संपली की, नगरसेवक पुन्हा अदृश्य होतात.५ लाखांचा निधी, ५० हजारांचे काम..!
इथे निधी येतो ५ लाखांचा, पण काम दिसते ५० हजारांचे. उरलेला निधी कुठे जातो, यावर नागरिकांनी आता प्रश्न विचारायचेही सोडून दिले आहेत. कारण उत्तर मिळण्याची शक्यता शून्य आहे.निष्कर्ष..!
प्रभाग क्रमांक ६ मध्ये,
पाणी आहे पण येत नाही,
पाईपलाईन आहे पण चालू नाही,
नाली आहे पण उपयोगाची नाही,आणि नगरसेवक आहेत पण फक्त निवडणुकीपुरते…!
नागरिकांचा एकच सवाल आहे
“पुढच्या पाच वर्षांत तरी विकास येणार आहे का, की तोही टँकरनेच येणार?”
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


