विकासाची आस, सेवेचा ध्यास, हाच वडगाव प्रभागातील भाजपावरील विश्वास..!
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५..२६ च्या पार्श्वभूमीवर वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकासाची अपेक्षा आणि सेवेचा ठाम ध्यास घेऊन भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारांचा पॅनल जनतेसमोर उतरला आहे. कमळ या अधिकृत निवडणूक चिन्हावर लढणाऱ्या या पॅनलला प्रभागातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.
या पॅनलमध्ये महिला (सर्वसाधारण) प्रवर्गातून माजी महापौर सौ. राखी कंचलावार, महिला (ओबीसी) प्रवर्गातून सौ. सोनल प्रकाश देवतळे, पुरुष (सर्वसाधारण) प्रवर्गातून माजी नगरसेवक श्री. देवानंद वाढई, तर पुरुष (ओबीसी) प्रवर्गातून श्री. सत्यम गाणार यांचा समावेश आहे. अनुभव, कार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ या चारही उमेदवारांत दिसून येतो.
महिला (ओबीसी) उमेदवार सौ. सोनल प्रकाश देवतळे या B.Sc., D.Ed. शिक्षण घेतलेल्या असून त्या सामाजिक कार्यात कायम सक्रिय आहेत. सिद्धीविनायक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वडगाव प्रभागात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाल्या, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर थेट काम केले आहे. त्यामुळे त्या प्रभागातील घराघरात ओळखीचा आणि विश्वासाचा चेहरा ठरल्या आहेत.
माजी महापौर सौ. राखी कंचलावार यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे या पॅनलला भक्कम बळ मिळत आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामांना गती मिळाली होती. तसेच माजी नगरसेवक श्री. देवानंद वाढई यांनी प्रभागात दीर्घकाळ काम केल्याने स्थानिक अडचणी, नागरिकांच्या गरजा आणि प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री. सत्यम गाणार हेही सामाजिक कार्यातून पुढे आलेले असून समाजातील विविध घटकांशी त्यांचा थेट संपर्क आहे.
चारही उमेदवारांनी वडगाव प्रभागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची स्वच्छता, शिक्षण सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
पारदर्शक कारभार, नियोजनबद्ध विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना न्याय देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळेच विकासाची आस आणि सेवेचा ध्यास जपणाऱ्या या पॅनलकडे वडगाव प्रभागातील नागरिकांचा विश्वास अधिक घट्ट होताना दिसत असून, येत्या निवडणुकीत कमळ चिन्हाला भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


