Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीरुग्णालयात फळवाटप करून पत्रकार दिन साजरा..!

रुग्णालयात फळवाटप करून पत्रकार दिन साजरा..!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रावती शाखेचा समाजाभिमुख उपक्रम

भद्रावती:- ऑनलाईन न्यूज डेस्क

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. सन १८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून सत्यनिष्ठ, निर्भीड आणि समाजप्रबोधनात्मक पत्रकारितेचा पाया घातला. त्याच वारशाला पुढे नेत आजचे पत्रकार समाजाशी नातं घट्ट ठेवत आपली सामाजिक जबाबदारी निभावत असल्याचं या निमित्तानं दिसून आलं.
याशिवाय पत्रकार दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रावती शाखा (मुंबई तालुका शाखा) यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रुग्णांना फळवाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला. हा उपक्रम पत्रकारितीची समाजाशी असलेली बांधिलकी दाखवणारा ठरला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ताजी फळं देताना पत्रकार बांधवांनी लोकहितासाठी सत्य व निस्पक्ष पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. पत्रकार संघाच्या या पुढाकाराचं त्यांनी कौतुक करत, “अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे रुग्णांना मानसिक आधार मिळतो,” असं मत व्यक्त केलं.
या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रावती शाखेचे पदाधिकारी सरचिटणीस सुनील दैदावार, कार्याध्यक्ष पवन शिवणकर शाम चटपल्लीवर, महेश निमस्टर, पुंडलिक येवले, माजरी शाखा अध्यक्ष अनिल इंगोले, विनोद वांढरे आदी पत्रकार बांधव सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सुनील दैदावार म्हणाले, “आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही पत्रकारितेला केवळ बातम्यांपुरती मर्यादित ठेवणार नाही, तर समाजसेवेचा अविभाज्य भाग बनवू.”
तसेच मराठी पत्रकार दिन हा केवळ उत्सव नसून पत्रकारितीच्या मूल्यांचा आढावा घेण्याचा दिवस आहे. भद्रावतीसारख्या ग्रामीण भागात राबवलेला हा उपक्रम पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी पुन्हा एकदा  स्पष्ट करणार राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा होत असताना, भद्रावतीतील हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!