रोख-ठोक,ऑनलाइन न्यूज डेस्क
महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेचा पाया ६ जानेवारी १८३२ रोजी रोवला गेला. त्या ऐतिहासिक दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी नियतकालिक सुरू करून समाजाला सत्याचा आरसा दाखवला. चुकीवर बोट ठेवणे, अन्याय उघड करणे आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहणे हीच पत्रकारितेची खरी ओळख त्यांनी त्या काळात ठामपणे मांडली.
बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी गावातील प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी च्या विद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच प्राध्यापक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या या विद्वानाने पत्रकारितेला नवे रूप दिले. अवघ्या २० वर्षांच्या वयात त्यांनी दर्पण चे संपादकपद सांभाळले, जे ब्रिटिश राजवटीत एक मोठे धाडस होते.
दर्पण हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन होते. हे पाक्षिक नियतकालिक सुरुवातीला अर्धे मराठी आणि अर्धे इंग्रजी अशा स्वरूपात प्रसिद्ध होत असे, जेणेकरून ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही त्याची माहिती मिळेल. वृत्तपत्रात अंधश्रद्धा, सामाजिक अन्याय, जातीभेद, स्त्रियांची दुर्दशा, सतीप्रथा, अस्पृश्यताणआणि बालविवाह यांसारख्या विषयांवर निर्भीड लेखन केले जात असे. समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही तत्त्वे मांडत जांभेकरांनी समाजसुधारणेचे बीज रोवले. पहिल्या वर्षीच ३०० वर्गणीदार मिळाले आणि हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे २६ जानेवारी १८४० पर्यंत चालले.
याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन किंवा दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त शुभेच्छांचा नसून पत्रकारितेच्या मूल्यांची आठवण करून देणारा आहे. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जांभेकर सांगत, “सत्ता किंवा दबावाची पर्वा न करता सत्य सांगणे म्हणजे पत्रकारिता.” त्यांनी देश-काळ-परिस्थिती आणि परदेशी राजव्यवहार यांचे ज्ञान लोकांना दिले.
आज डिजिटल युगात पत्रकारितेचे माध्यम बदलले आहे. कागदाच्या जागी ऑनलाइन प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि २४x७ न्यूज चॅनेल्स आले आहेत. माहिती वेगाने पोहोचते, पण त्याचबरोबर खोट्या बातम्या, अफवा आणि अपूर्ण माहिती चे प्रमाणही वाढले आहे. १९९७-९८ मध्ये मराठीत १५६१ वृत्तपत्रे आणि २२५ दैनिके असताना, आज डिजिटल माध्यमांतून लाखो बातम्या रोज प्रसिद्ध होतात. यामुळे पत्रकाराची जबाबदारी अधिक वाढली आहे वेगाइतकी खात्री , प्रसिद्धीइतकं लोकहित आणि तथ्यतपासणी हे मूल्य महत्त्वाचे ठरले आहेत.
दर्पण दिन हा प्रत्येक पत्रकाराने आणि माध्यमाने स्वतःला विचारण्याचा आहे: आपण सत्य मांडतोय का? सामान्य माणसाचा आवाज बनतोय का? लोकहिताला प्राधान्य देतोय का? जांभेकरांच्या वारशाने प्रेरित होऊन आजच्या पत्रकारांनी
फेक न्यूजविरुद्ध लढा द्यावा आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नये.मराठी पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेला वंदन करत, सत्य, तथ्य आणि लोकहित यांवर आधारित पत्रकारितेचा संकल्प दृढ करूया.
सत्याची मशाल पेटविणारा हा दिवस दर्पण दिन पत्रकारितेच्या खऱ्या मार्गाची आठवण करून देतो.रोखठोक ऑनलाईन न्यूज..!
डेस्क कडून…✍️
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


