Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूरपक्षांतर्गत गटबाजीचे शिकार बनलेले "इम्रान खान", मतदारांचा नाराजीतून सूर...!

पक्षांतर्गत गटबाजीचे शिकार बनलेले “इम्रान खान”, मतदारांचा नाराजीतून सूर…!

भद्रावती (प्रतिनिधी):- स्थानिक राजकारणात नेहमीच सक्रिय भूमिका निभावणारे इम्रान खान हे भाजपा व भारतीय जनता युवा मोर्च्यातील एक प्रभावी व लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
तसेच जात,पात, पक्षांतर्गत गटबाजी किंवा वैयक्तिक स्वार्थ यांचा कधीच विचार न करता विविध सामाजिक स्तरातील नागरिकांची शासकीय कामे त्यांनी सातत्याने केली आहेत.
तथापि, स्थानिक पातळीवर जनतेचा विश्वास मिळवूनही, अशा जनसेवकाला उमेदवारीपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
या प्रकरणाने पक्षीय स्थानिक संघटनांमध्ये अंतरंगात मोठे वादळ निर्माण झाले आहे.
दरम्यान मतदारांमध्ये यावर नाराजी व्यक्त होत असून, “जनतेसाठी काम करणाऱ्याला जर पक्ष डावलत असेल, तर जनता पक्षालाच जागा दाखवून देईल,”
अशा रोखठोक प्रतिक्रिया ऐकू येत आहेत.
या वाक्यांतून स्पष्ट दिसून येते की, भद्रावतीच्या सामान्य नागरिक आणि मतदार इम्रान खान यांच्या कामगिरीवर अत्यंत संतुष्ट आहेत.
याशिवाय युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद, शासन व विविध पातळ्यांवर प्रकल्पांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रसंगी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने अनेक महत्त्वाचे काम केले आहेत, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची प्रतिष्ठा दृढ झाली आहे.
पक्षाचा स्थानिक संघटनांमध्ये यामुळे अंतरंगात मोठे वादळ वाढत असून, आगामी निवडणुकीत हे एक मोठे राजकीय वादळ ठरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. राजकीय विश्लेषकांनुसार, जर “पक्ष” अशा जनसेवकांना दूर ठेवत राहिल, तर ते मतदारांमध्ये अविश्वास निर्माण करू शकते.
स्थानिक राजकारणातील या संघर्षाचे परिणाम निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी स्पष्टपणे दिसून येतील.
जनता जर खरोखर जनसेवकांचे मूल्यांकन करत असेल, तर उमेदवारीपासून दूर ठेवलेल्या कार्यकर्त्यांचा हा प्रश्न हा भविष्यातील राजकीय बदलांचा संकेत असू शकतो.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!