Wednesday, July 29, 2026
Homeभद्रावतीभद्रावती बसस्थानक परिसरात एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; २३ हजार रुपयांचा मुद्देमाल...

भद्रावती बसस्थानक परिसरात एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती बसस्थानक परिसरात एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; २३ हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात अमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती बसस्थानक परिसरात एक मुलगा एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर (किंमत १३ हजार) आणि रिअलमी कंपनीचा मोबाईल (किंमत १० हजार) असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ९५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुरवार, पोलीस अंमलदार खुशाल कावडे, संतोष राठोड, योगेश घाटोळे तसेच चालक म.पो.अं. ६०२६ यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात भद्रावती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!