Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरबल्लारपूरमध्ये एमडी ड्रग्जचा पर्दाफाश; आयफोन, दुचाकीसह १ लाख ९९ हजार रुपयांचा माल...

बल्लारपूरमध्ये एमडी ड्रग्जचा पर्दाफाश; आयफोन, दुचाकीसह १ लाख ९९ हजार रुपयांचा माल हस्तगत

बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त; आयफोन, दुचाकी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा हस्तगत

बल्लारपूर ,  प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील धडक कारवाई करत दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह एकूण १ लाख ९९ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, न्यू पेपर मिल कॉलनी, कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर येथे दोन युवक मोटारसायकलवरून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसमक्ष सापळा रचून संशयितांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान ४ हजार ४५० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज (किंमत २२ हजार ९२०), आयफोन-१३ (५० हजार ), टीव्हीएस मोटारसायकल (१ लाख), रिअलमी पी-१ 5G मोबाईल ( २ हजार ) तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा (२५ हजार) असा एकूण १ लाख ९९ हजार ९२०  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहीती प्राप्त झाली

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार (राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संतोष पंडित, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, महेश कुकुडकर, लखन चव्हाण, वैभव गाडगे, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी तसेच महिला पोलीस अंमलदार अनिता नायडू आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अमली पदार्थांविरोधातील ही कारवाई बल्लारपूर पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमेचा भाग असून, अशा बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!