Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरआम आदमी पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. विशाल नीलकंठराव शिंदे यांची उमेदवारी जाहीर

आम आदमी पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. विशाल नीलकंठराव शिंदे यांची उमेदवारी जाहीर

भद्रावती (प्रतीनीधी):-भद्रावती नगर परिषद निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रतिष्ठित, प्रतिभावान आणि सर्वमान्य असे नाव असलेल्या डॉ. विशाल नीलकंठराव शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार घोषित केले आहे.
शिक्षण, क्रीडा, समाजकारण आणि संघटनात्मक कार्यात भक्कम योगदान असलेले डॉ. शिंदे हे शहरातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
डॉ. विशाल शिंदे यांनी आर.टी.एम. नागपूर विद्यापीठातून एम.ए. (मराठी), एम.ए. (राजकीयशास्त्र), बी.पी.एड., एम.पी.एड. आणि पी.एच.डी. (शारीरिक शिक्षण) या पदव्या संपादन केल्या आहेत. सध्या ते नीलकंठराव शिंदे विज्ञान आणि कला महाविद्यालय, भद्रावती येथील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ११ वर्षे ७ महिने शिक्षणाचा अनुभव असून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पीएच.डी. मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
समाजकारण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची चमक विशेष उल्लेखनीय आहे. ते भद्रावती शिक्षण संस्थेचे कार्यकारी सहसचिव, चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो संघाचे अध्यक्ष, तसेच विद्यार्थी युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विदर्भ एमेच्योर कबड्डी असोसिएशनची रेफरी परीक्षा (२०ऑक्टोबर २०२३) उत्तीर्ण केली आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्यांनी भद्रावतीचे नाव अनेक वेळा उज्वल केले आहे. २५वी महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदक, स्केटिंग हॉकी, स्पीड स्केटिंग आणि रोलर हॉकीमध्ये राज्यस्तरीय सहभाग, तसेच 14 मार्च २०२१ रोजी तायक्वांडो ब्लॅक बेल्ट हे त्यांचे महत्त्वाचे टप्पे आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी ३ पुस्तके, १०आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित केले असून १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्वामी विवेकानंद सरस्वती राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४७८ खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ/पश्चिम विभाग/अश्वमेध स्पर्धांमध्ये भद्रावतीचे प्रतिनिधित्व केले असून सर्व खेळाडूंना रंगीत कोट प्रदान करण्यात आले आहेत.
आम आदमी पक्षाने अशा बहुगुणी, परिश्रमी आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी दिल्याने भद्रावतीच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. जनतेच्या अपेक्षा, शहराचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक प्रशासन ही डॉ. विशाल शिंदे यांची प्रामाणिक भूमिका असल्याचे पक्षाने सांगितले.
भद्रावतीच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. विशाल शिंदे हेच सक्षम नेतृत्व, असा विश्वास आम आदमी पक्षाने व्यक्त केला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!