भद्रावती(प्रतीनीधी):-माजरी ग्राम पंचायतने लिपिक भरतीच्या नावाखाली उघडपणे धिंगाणा घातला, असा स्फोटक आरोप परीक्षार्थ्यांनी पत्रपरिषदेत करत ग्रामपंचायतीचे कान ऐकू जाईपर्यंत इशारा दिला,
“ही भरती रद्द झाली नाही तर आम्ही रस्त्यावर पडू, आमरण उपोषण अन् तीव्र आंदोलनाला सुरुवात होईल!”
तीन वर्षे पद रिक्त, आणि निवडणुकीच्या तोंडावरच ‘घाईघाईत’ भरती!
तिन वर्षे पद रिकामे ठेवून नुसते धूळ खात ठेवले…
आणि निवडणुकीची चाहूल लागताच अचानक जाहिरात!
हा ‘योगायोग’ की ‘ठरलेला कार्यक्रम’?
परीक्षार्थ्यांनी प्रश्न थेट पोटात खुपसला.
हॉलतिकिटे फक्त २ दिवस आधी अभ्यासक्रम नाही, मार्गदर्शक सूचना नाही… काहीच नाही!
ही भरती प्रक्रिया नसून अकार्यक्षमतेचा चारचौघात तमाशा असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे.
अभ्यासक्रम नाही, विषय नाही, सूचना नाही.
मग परीक्षा कशावर घेतली? आजमावण्यावर की जमवण्यावर?
१५ परीक्षार्थी, एकाला ९४, इतर तयारीवाल्यांना ७२!
हा चमत्कार की चेहऱ्यावर उघड केलेला पक्षपात?
सहा-सहा वर्षे अभ्यास करणाऱ्याला ७२
आणि एका ‘भाग्यवानाला’ ९४
यावर परीक्षार्थ्यांचा थेट आरोप,
“हा निकाल नाही… हे तर तयार केलेलं स्कोरकार्ड!”
पेपर परीक्षा होण्याआधीच बाहेर फिरत होता.
थेट पेपरफुटीचा आरोप
परीक्षार्थ्यांनी सर्वात मोठा स्फोट केला.
“परीक्षेचा प्रश्नपत्रिका आधीच बाहेर होती. हा सरळ सरळ गैरप्रकार आहे.”
ग्रामपंचायतीला आम्ही सरळ आव्हान देतो.
परीक्षा रद्द करा!
नाहीतर आम्हीच रद्द करू तुमची शांतता!
अन्यायग्रस्त परीक्षार्थ्यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली,
“पुनर्परीक्षा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावरच. ग्रामपंचायत स्तरावर नाही कोणत्याही परिस्थितीत नाही!”
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल असून
चौकशी सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती परीक्षार्थ्यांनी दिली.
पत्रपरिषदेला अविनाश जीवतोडे, मिलिंद शेंडे, रितेश चिकटे, विजया रामटेके, सिलू सिंग आणि विस्मय बहादे उपस्थित होते.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


