Friday, April 17, 2026

माजरी ग्राम पंचायतने लिपिक भरतीच्या नावाखाली उघडपणे धिंगाणा घातला, असा स्फोटक आरोप परीक्षार्थ्यांनी पत्रपरिषदेत करत ग्रामपंचायतीचे कान ऐकू जाईपर्यंत इशारा दिला,
“ही भरती रद्द झाली नाही तर आम्ही रस्त्यावर पडू, आमरण उपोषण अन् तीव्र आंदोलनाला सुरुवात होईल!”
तीन वर्षे पद रिक्त, आणि निवडणुकीच्या तोंडावरच ‘घाईघाईत’ भरती!
तिन वर्षे पद रिकामे ठेवून नुसते धूळ खात ठेवले…
आणि निवडणुकीची चाहूल लागताच अचानक जाहिरात!
हा ‘योगायोग’ की ‘ठरलेला कार्यक्रम’?
परीक्षार्थ्यांनी प्रश्न थेट पोटात खुपसला.
हॉलतिकिटे फक्त २ दिवस आधी अभ्यासक्रम नाही, मार्गदर्शक सूचना नाही… काहीच नाही!
ही भरती प्रक्रिया नसून अकार्यक्षमतेचा चारचौघात तमाशा असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे.
अभ्यासक्रम नाही, विषय नाही, सूचना नाही.
मग परीक्षा कशावर घेतली? आजमावण्यावर की जमवण्यावर?
१५ परीक्षार्थी, एकाला ९४, इतर तयारीवाल्यांना ७२!
हा चमत्कार की चेहऱ्यावर उघड केलेला पक्षपात?
सहा-सहा वर्षे अभ्यास करणाऱ्याला ७२
आणि एका ‘भाग्यवानाला’ ९४
यावर परीक्षार्थ्यांचा थेट आरोप,
“हा निकाल नाही… हे तर तयार केलेलं स्कोरकार्ड!”
पेपर परीक्षा होण्याआधीच बाहेर फिरत होता.
थेट पेपरफुटीचा आरोप
परीक्षार्थ्यांनी सर्वात मोठा स्फोट केला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!