Wednesday, April 22, 2026
Homeभद्रावतीएमएसईबी vs नगर परिषद वाद संपला; अखेर खांब हटला!

एमएसईबी vs नगर परिषद वाद संपला; अखेर खांब हटला!

भद्रावती (प्रतिनिधी): गणपती वॉर्ड, गवराळा येथील गाडगे महाराज मंदिर परिसरात वासुदेव बावणे यांच्या घरासमोर रस्त्याच्या मध्यभागी धोकादायकरीत्या उभा असलेला विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण करीत होता.
प्रसंगी अनेक दिवसांपासून हा खांब झुकलेल्या अवस्थेत असल्याने कधीही कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी नगर परिषद आणि एमएसईबीला वारंवार निवेदनांद्वारे खांब हटविण्याची मागणी केली होती. मात्र “एमएसईबीची जबाबदारी”
“नगर परिषदेची कारवाई” असा दोन्ही विभागांचा लपंडाव सुरूच राहिला आणि समस्या तशीच कायम होती.
या वादातून कोण जबाबदार हे स्पष्ट न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
दरम्यान, प्रफुल चटकि यांनी स्वतः पुढाकार घेत हस्तक्षेप केला, संबंधित विभागाशी समन्वय साधला आणि अखेर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी सोडवण्यात यश मिळाले. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर हा जीवघेणा खांब हटविण्यात आला.
खांब हटल्याने स्थानिक नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून उशिरा का होईना, पण नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कारवाई झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!