भद्रावती (प्रतीनीधी):- तालुक्यातील मानोरा फाटा परिसरात बनावट आणि रासायनिक ताडीची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. भाजयुमोचे प्रदेश सचिव व जनसेवक इम्रान खान यांनी पोलिसांना या प्रकरणाची अधिकृत माहिती दिली असून विक्रीत लगेच छापेमारी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.या दरम्यान भद्रावती तालुक्यातील मानोरा फाटा भागात क्लोरोहायड्रेट पावडर वापरून तयार केली जाणारी बनावट ताडी सहजपणे बाजारात उपलब्ध असल्याचे उघडकीस आले आहे. या ताडीमुळे स्थानिक लोकांचा जीव धोक्यात येत असून, आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विक्रीतून काही धंदेबाज दररोज हजारो रुपयांचा बेकायदेशीर नफा कमावत आहेत. मात्र, नागरिकांचा जीव आणि आरोग्य यांचा तर त्यांनी कुठलाही विचार केल्याचा नाही.या प्रसंगी भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान म्हणाले, “बनावट ताडीमुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने त्वरित या विक्रीवर बंदी घालून गुन्हे दाखल करावे; अन्यथा भाजयुमो तर्फे मोठ्या आंदोलनाचा इशारा देणार आहे.” याचबरोबर परिसरातील नागरिकांनीही बनावट ताडीविरोधात प्रखर निषेध व्यक्त केला आहे आणि सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.या घटनाक्रमानं केवळ भद्रावतीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात अनियंत्रित ताडी विक्रीचे दुःखद दृश्य दिसून येते आहे. या वाढत्या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे, व्यावस्थित तपासणी आणि नियंत्रण घालणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “फक्त प्रमाणित, सुरक्षित ताडीच विक्रीला परवानगी द्यावी आणि लोकांच्या आरोग्यास जोखमीची स्थिती निर्माण होऊ देऊ नये” असे आवाहन त्यांनी केले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


