भद्रावती (प्रतीनिधी):-पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत गुन्हे शोध पथकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी कायदेशीर कारवाई करून एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
प्रसंगी पोलीस स्टेशन भद्रावती येथील गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना, मुखबीरामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की भद्रावती शहरातील भंगाराम वॉर्ड येथील स्मशानभूमी परिसरात एक इसम लपूनछपून प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करीत आहे.
सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांना कळविण्यात आली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक यांचा नेतृत्वात पोलीस पथकाने पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया राबवून सापळा रचला. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या थैलीतून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० चकऱ्या आढळून आल्या. प्रत्येकी अंदाजे १ हजार रुपये किंमतीप्रमाणे एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी गणेश नारायण कामतवार याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप.क्र. ७६९/२०२५ अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ चे कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ४९ व २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल (वरोरा) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचा नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोडे, संतोष राठोड व रोहित चिटगीरे यांनी केली.
दरम्यान, आरोपीकडून प्रतिबंधित नायलॉन मांजाचा पुरवठा कुठून होत होता व या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहेत का, याबाबत पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे.
याशिवायही बंधन घालण्यात आलेला नायलॉन मांजा मानवी जीवन, सार्वजनिक सुरक्षितता, प्राणीजीवन तसेच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण करीत असल्याने शासनाने त्याच्या उत्पादन, विक्री व वापरावर पूर्णतः बंदी घातली आहे. नागरिकांनी शासनाच्या आदेशांचे पालन करावे व प्रतिबंधित नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


