चंद्रपूर. न्यूज डेस्क✍️
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५तसेच २६ करीता प्रभाग क्रमांक ८ (अ) मधून सौ. सोनल प्रकाश देवतळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्या भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवत असून त्यांचे निवडणूक चिन्ह कमळ आहे.
त्या ओबीसी महिला प्रवर्गातील उमेदवार आहेत.
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सौ. सोनल प्रकाश देवतळे यांनी आई, सून आणि लेक या भूमिका निभावताना जनतेच्या रोजच्या अडचणी अगदी जवळून पाहिल्या आहेत. घर-संसार सांभाळत समाजातील प्रश्न समजून घेत, “फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचं” या ठाम भूमिकेतून त्यांनी जनसेवेचा वसा स्वीकारला आहे.या माध्यमातून वडगाव प्रभागात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाल्या, ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यात आले आहे. लोकांशी थेट संवाद, समस्या ऐकून घेणे आणि त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांची काम करण्याची सरळ व रोखठोक पद्धत आहे.
याशिवाय B.Sc., D.Ed. या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर शिक्षण सुधारणा, महिलांचे सबलीकरण आणि युवकांचा विकास यासाठी ठोस काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. प्रभागाचा पारदर्शक, नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्या ठामपणे सांगतात.
दरम्यान, प्रभागातील मतदारांनी विश्वास दाखवून मतदानातून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन जनसेविका सौ. सोनल प्रकाश देवतळे यांनी केले आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


