Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरबॅनर आधी उचलले, पत्रकार परिषद; शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा ‘समान न्याय ’ सवाल..!

बॅनर आधी उचलले, पत्रकार परिषद; शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा ‘समान न्याय ’ सवाल..!

 शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा ‘समान न्याय करा खडा ’ सवाल..!

चंद्रपूर न्यूज डेस्क..
प्रमोद दुबे✍️

चंद्रपूर:- मनपा निवडणूक २०२६ मध्ये बॅनर उचल मोहीम इतकी वेगवान ठरली की प्रश्न उभे राहण्याआधीच बॅनर गायब झाले. अखेर या ‘अदृश्य बॅनर प्रकरणा’वर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि प्रशासनाला थेट सवाल करण्यात आले.

६ जानेवारीपासून मनपाच्या फिरत्या पथकाने इलेक्ट्रिक पोलवरील बॅनर हटवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे काही बॅनर इतके शिस्तबद्ध दिखले की त्यांच्यावर कारवाईच झाली नाही, तर काही बॅनर मात्र नियम पाळूनही थेट गाडीत बसले. यामुळे शहरात “बॅनरही पक्ष पाहून वागतात का?” अशी चर्चा रंगली.

या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार हिमायूं अली, शिल्पा कांबळे, सुनीता खोड़े आणि राजेशम दुर्गया फुल्लोरी यांनी संयुक्तपणे प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

हिमायूं अली यांनी टोलेबाज शैलीत सवाल केला,
“आता बॅनर लावताना डिपॉझिटसोबत पक्ष प्रमाणपत्रही द्यायचं का? कारण काही बॅनर अजूनही मोकळे फिरतायत, तर काहींना नियम आठवले!”

शिल्पा कांबळे यांनी सांगितले की, सर्व उमेदवारांनी मनपाकडून अधिकृत परवानगी घेतली आहे, तरी कारवाई फक्त काहींवरच होत असेल तर हा न्याय कुठला, असा प्रश्न उपस्थित होतो.

सुनीता खोड़े यांनी स्पष्ट केले की, अशा एकतर्फी कारवायांमुळे मतदारांमध्ये प्रशासनाबद्दल अविश्वास निर्माण होत आहे, तर राजेशम दुर्गया फुल्लोरी यांनी “नियम सर्वांसाठी सारखे असतील तर कारवाईही सारखीच असावी,” अशी मागणी केली.

पत्रकार परिषदेत प्रश्न भरपूर होते, आरोप स्पष्ट होते; मात्र उत्तरं अजूनही ‘फिरत्या पथकात’च अडकलेली दिसत आहेत. मनपा आयुक्तांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नसल्याने बॅनरपेक्षा वादच जास्त झळकतो आहे….

नागरिक मात्र मिश्कीलपणे म्हणत आहेत,
“यंदा निवडणुकीत उमेदवारांपेक्षा बॅनरच जास्त चर्चेत आलेत!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!