Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरभद्रावती तालुक्यातील तांडा गाव सध्या चर्चेत आहे… पण कारण मात्र छानसं बदललंय!

भद्रावती तालुक्यातील तांडा गाव सध्या चर्चेत आहे… पण कारण मात्र छानसं बदललंय!

 

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

एकेकाळी बाहेरचा माणूस आला की सहज विचारायचा ..
“मोहफुलाची दारू कुठे मिळेल?”
आता मात्र प्रश्न थोडे वेगळे झालेत
“कोणता मुलगा एम.ए. झाला?”,
“कोण पीएच.डी. करतोय?”,
आणि “पुढे गावाचं नेतृत्व कोण करणार?”
पूर्वी गावात सकाळ मोहफुलाच्या कामाने सुरू व्हायची,
आता ती कॉलेजच्या बसच्या हॉर्नने सुरू होते.
बाटल्यांची जागा हळूहळू
पुस्तकं, फाईल्स आणि विचारमंथनाने घेतली आहे.
कालपर्यंत हातात गिलास दिसायचा,
आज हातात डिग्रीचं सर्टिफिकेट झळकतंय.
तेव्हा चर्चा हलक्याफुलक्या गप्पांवर,
आता चर्चा विकास, शिक्षण आणि भविष्यावर होताना दिसते.
थोडक्यात काय तर..
तांडा गावाने जुन्या ओळखीला मागे टाकत
युवकांच्या शिक्षणाची आणि प्रगतीची वाट धरली आहे.
आणि हे बदल पाहून गाव स्वतःच हसत म्हणतंय..
“अरे वा… आपलं गाव खरंच पुढे निघालंय!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!