रेतीचा प्रश्न गंभीर… पण चर्चा मात्र व्हॉट्सअॅपवरच!
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
तालुक्यातील अवैध रेती उत्खननावर प्रश्न उपस्थित करणारी बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची चांगलीच “हलचल” दिसली. आणि ही हलचल थेट मैदानावर नव्हे तर आधी व्हॉट्सअॅपवरच पोहोचली!
तहसील कार्यालयाकडून भरारी पथक कार्यरत असल्याचे काही फोटो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाठविण्यात आले. फोटोमध्ये अधिकारी दिसतात, गाड्या दिसतात… पण नागरिकांचा प्रश्न वेगळाच
“ही कारवाई रोजची आहे का, की आज विशेष फोटो डे?”
तालुक्यातील काही दुर्गम नाले, नदीपात्र भाग आणि गावाकडील रस्त्यांवरून रेतीचे हायवा वेगाने धावत असल्याच्या चर्चा सुरू असताना अचानक पथकाचे दर्शन झाल्याने बाजारपेठेत मिश्किल वातावरण आहे.
काही जण म्हणतात
“रेती उत्खनन २४ तास… कारवाई मात्र ‘फोटोसेशन टाइम’मध्ये!”
तर काहींचा टोला
“रेतीचे ट्रक रस्त्यावर, आणि कारवाईची गती नेटवर्कवर!”
नेमकी किती जप्ती? किती दंड? किती गुन्हे?
याची अधिकृत माहिती मात्र अजूनही ‘लोडिंग’मध्येच असल्याचे दिसते.
फोटोतील कारवाई की प्रत्यक्ष धडक मोहीम?
रेतीचे ट्रक धावतात वेगाने… पण कारवाईचा वेग किती?
याचा खुलासा पुढील भागात…


