Friday, April 17, 2026
Homeभद्रावती“कागदावरचे आदेश नकोत, रस्त्यावरची कारवाई हवी; लढा सुरूच राहील!” इम्रान खान

“कागदावरचे आदेश नकोत, रस्त्यावरची कारवाई हवी; लढा सुरूच राहील!” इम्रान खान

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड परिसरात जड वाहनांची बेफाम ये-जा सुरूच असल्याने भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान अफजल रफीक खान यांनी प्रशासनावर रोखठोक शब्दांत टीका करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

इम्रान खान म्हणाले,
“आदेश कागदावर काढून जबाबदारी संपत नाही.
अपघात घडल्यानंतरही जर हायवा रस्त्यावर धावत असतील, तर त्या आदेशांची किंमत शून्य आहे. आम्हाला आश्वासन नकोप्रत्यक्ष कारवाई हवी.”

त्यांनी स्पष्ट केले की हा प्रश्न येथील स्थानिक नागरीकांचा लहान मुला, बाळांचा सुरक्षिततेचा आहे. सकाळ-सायंकाळच्या गर्दीत शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक या मार्गाने जात असताना जड वाहनांची हालचाल अत्यंत धोकादायक ठरत आहे.

खान यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत सांगितले..!

लेखी आदेशानंतर किती वाहनांवर कारवाई झाली?

गर्दीच्या वेळेत प्रवेशबंदीची अंमलबजावणी कोणी पाहत आहे?

अपघातानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ का आहे?

त्यांनी तीन ठोस मागण्या पुन्हा मांडल्या..!

१) सकाळ व सायंकाळी जड वाहनांना संपूर्ण प्रवेशबंदी.

२) बाजारपेठेत कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची तैनाती.

३)नियमभंग करणाऱ्यांवर कठोर आणि पारदर्शक कारवाई.

इम्रान खान यांनी शेवटी ठाम शब्दांत जाहीर केले
“भद्रावतीकरांच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहील. जोपर्यंत जड वाहतूक नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!