भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील प्रश्न आता टोकाला गेलेत. जनता हैराण झालीये. हाच सगळा प्रकार पाहून आमदार करण देवतळे सरळ मैदानात उतरले आणि कुचना रेस्ट हाऊसवर बैठक घेऊन वेकोलीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
तसेच बैठकीत माजरी परिसरात चाललेले सगळे प्रश्न एकेक करून काढले गेले.धूळ ,प्रदूषण वाढतंय, जमीन घेताना लोकांची अडवणूक होतेय, पोरांना काम नाही, सोनाई कंपनीचं रेल्वेचं काम अर्धवट, कावडी-कुन्हाळा गावचे विस्थापित अजूनही भटकंतीत, रस्ते खड्ड्यात, पाणी कमी, CSRची कामं कागदावरच… आणि वर वर्धा नदीकाठी ओबी टाकण्याचा प्रकार सगळ्यावर जोरदार चर्चा झाली.
दरम्यान देवतळे यांनी थेट शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावलं “आता फक्त बोलणं नको, काम करा… नाहीतर कारवाईला तयार राहा!”यामुळे बैठकीतच वातावरण तापलं होतं.
या प्रसंगी लोकांचा संताप वाढतोय, हे लक्षात घेऊन देवतळे म्हणाले की, “जनतेला फसवायचं बंद करा. जे प्रश्न आहेत ते लगेच सोडवा.” प्रशासनाने आता कामात गती आणली नाही, तर पुढे कठोर पावलं उचलली जातील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
या बैठकीला वेकोलीचे जीएम राकेश प्रसाद, एसडीओ संदीप भस्के, तहसीलदार भांडारकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.
बैठकीच्या शेवटी अधिकाऱ्यांनी “काम करू” असं सांगितलं खरं… पण आता खरंच काम होतं का, की पुन्हा फक्त आश्वासनं दिली जातात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


