Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीमीथलेश चन्ने यांचा हायवा ‘रेती उतरण्याच्या सेवेत’! भद्रावतीत ८ ब्राससह रंगेहात...

मीथलेश चन्ने यांचा हायवा ‘रेती उतरण्याच्या सेवेत’! भद्रावतीत ८ ब्राससह रंगेहात पकड; १० ब्रास ट्रकही जप्त

मीथलेश चन्ने यांचा हायवा ‘रेती उतरण्याच्या सेवेत’!

भद्रावतीत ८ ब्राससह रंगेहात पकड; १० ब्रास ट्रकही जप्त

गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे पहाटेचा ‘रेती शो’ बंद; “परवाना कुठे?” विचारताच शांतता..!

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक इतकी ‘नियमित’ झाली आहे की, आता ती पहाटेच्या थंड वातावरणात ‘डेली शिफ्ट’प्रमाणे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र यावेळी महसूल विभागाने अचानक एन्ट्री घेत ‘रेती शो’च बंद पाडला.

चंद्रपूरच्या मीथलेश चन्ने यांच्या मालकीचा MH-34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे अगदी आरामात ८ ब्रास रेती खाली करत होता. पाहणाऱ्याला वाटावे सगळं काही नियमात आहे! पण हा ‘आत्मविश्वास’ जास्त वेळ टिकला नाही.

तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेच सापळा रचण्यात आला. पथक योग्य वेळी घटनास्थळी पोहोचले आणि ‘रेती उतरण्याचा कार्यक्रम’ थेट बंद करण्यात आला.

यानंतर पथकाने नेहमीचा सरळ प्रश्न विचारला
“परवाना कुठे आहे?”

आणि मग… सगळीकडे शांतता!
कारण परवाना असता तर दाखवला असता ना!

परवाना नसल्याचे स्पष्ट होताच हायवा ताब्यात घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान, डॉली पेट्रोल पंप परिसरात आणखी एक भला मोठा ट्रक रेतीने भरलेला सापडला. त्यात तब्बल १० ब्रास रेती असल्याचे समोर आले. हा ट्रकही सापळा रचून जप्त करण्यात आला असून तो नागपूर (उमरेड) येथील वहीद शेख यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण कारवाई R.I. समीर वाटेकर, ग्राम महसूल अधिकारी तलहार, तळवेकर व त्यांच्या पथकाने अचूक टाइमिंगने पार पाडली म्हणजेच ‘रेतीवाल्यांना’ थेट सरप्राईज!

(थोडं कडू पण खरं),

परवाना नाही, पण काम मात्र वेळेवर!
पहाटे ५ वाजताच ‘रेती उतरण्याची शिफ्ट’,
प्रशासन येईपर्यंत सगळं सुरळीत नंतर शांतता
बाहेरच्या जिल्ह्यातील वाहनांचा मोकळा वावर..!

ही कारवाई फक्त ‘एक एपिसोड’ होता का?
की आता खरोखरच मोठ्या रेती माफियांवर कठोर कारवाई आहेत?

पुढील भागात मोठे खुलासे…
थांबा… अजून खूप काही बाकी आहे!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!