Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूररेती माफियांना संरक्षण?; पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे, चिमूरमध्ये खळबळ, दबाव तंत्राचा आरोप..!

रेती माफियांना संरक्षण?; पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे, चिमूरमध्ये खळबळ, दबाव तंत्राचा आरोप..!

अवैध रेती तस्करी उघड केल्याची ‘शिक्षा’?; पत्रकारांचा संताप “आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न”

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️

चिमूर तालुक्यातील अवैध रेती तस्करी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, रेती माफियांना संरक्षण देण्यासाठी पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा थेट व गंभीर आरोप संबंधित पत्रकारांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पत्रकारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही केवळ अवैध रेती तस्करीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची शिक्षा म्हणून आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. हा सरळसरळ दबाव तंत्राचा भाग असून, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.”

अवैध रेती तस्करीचा मोठा खेळ; प्रशासन मात्र मौन, मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील उमा नदी घाट, उसेगाव, सोनेगाव व गावंडे घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रीच्या अंधारात नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून खुलेआम रेती तस्करी होत असल्याचा आरोप आहे., यामध्ये काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, त्यामुळेच प्रशासन या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महसूल विभाग व पोलिस यंत्रणा गप्प बसल्यामुळे माफियांचे धाडस वाढल्याचेही चित्र आहे.

प्रत्यक्ष पाहणी; पत्रकारांना दिसला अवैध उपसा
प्रसंगी दिनांक २३ मार्च रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास उसेगाव घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी नंबर प्लेट नसलेल्या दोन ट्रॅक्टरमध्ये मजुरांच्या साहाय्याने रेती भरली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनेनंतर २४ मार्च रोजी संबंधित पत्रकारांनी नागपूर विभागाच्या आयुक्तांकडे व्हॉट्सअॅप व टेक्स्ट संदेशाद्वारे तक्रार नोंदवली.

दरम्यान तक्रार केल्यानंतर लगेचच फिर्यादीकडून पत्रकारांवर खंडणी मागितल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारांच्या खात्यावर ५ हजार रुपये ऑनलाइन पाठवून खंडणीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे.

याशिवाय पत्रकारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, “ही संपूर्ण कारवाई पूर्वनियोजित असून आम्हाला गप्प बसवण्यासाठी आखलेले षडयंत्र आहे,” असे ठामपणे सांगितले.

या प्रकरणात पत्रकारांनी प्रशासनासमोर अनेक थेट प्रश्न उपस्थित केले आहेत:

अवैध रेती उपसा सुरू असताना कारवाई का करण्यात आली नाही? नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कोणाचे संरक्षण आहे?, घटनास्थळाचा पंचनामा का करण्यात आला नाही?

दोन्ही बाजूंची पडताळणी न करता गुन्हे का दाखल करण्यात आले?

राजकीय दबावाखाली कारवाई झाली का?

“पत्रकार गप्प बसणार नाहीत” इशारा…!

पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“सत्य मांडणे हा आमचा कर्तव्य आहे. कोणत्याही दबावाला न जुमानता आम्ही आमचे काम करत राहू. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.”

तसेच पत्रकारांवर दाखल गुन्हे तात्काळ रद्द करावेत, खोट्या तक्रारदारांवर कठोर कारवाई करावी, अवैध रेती तस्करीवर तातडीने अंकुश लावावा, प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी, तणावपूर्ण वातावरण; चौकशीची गरज या मुख्य मागण्या आहेत

या संपूर्ण प्रकरणामुळे चिमूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Previous article
Next article
मुंबईत भाजयुमो प्रदेशाध्यक्ष महाडिक; प्रदेश सचिव इम्रान खान यांची भेट; संघटना विस्तारावर सखोल चर्चा..! युवकांना संघटनेशी जोडण्यावर भर..! चंद्रपूर न्यूज डेस्क✍️ मुंबईतील नरिमन पॉईंटवरील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली असून, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागातील भाजयुमोच्या कार्यपद्धतीवर विशेष भर देण्यात आला. प्रसंगी भाजयुमो प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरचे युथ आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडिक हे आंतरराष्ट्रीय रेसर असून, त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षादेश पाळत उमेदवारी माघार घेतली होती. या निष्ठेचे फळ म्हणूनच त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबईतील या भेटीमुळे महाराष्ट्र भाजयुमो च्या कार्याला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. भेटीदरम्यान चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागातील भाजयुमोच्या कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि आगामी काळात राबविलेल्या विविध कार्यक्रमांवर सखोल चर्चा झाली. जनसेवक इम्रान खान यांनी जनतेशी थेट संवाद साधत युवकांना संघटनेशी जोडण्याचे कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे चंद्रपूर ग्रामीण भागात भाजयुमोची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इम्रान खान हे भाजयुमोचे प्रदेश सचिव म्हणून सक्रिय असून, युवकांना संघटनेत संधी उपलब्ध करून देणे, त्यांना सक्रिय करणे आणि एकूण संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. या भेटीत संघटना बळकट करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात जोडण्यावर विशेष भर देण्यात आला. चंद्रपूरसारख्या ग्रामीण भागात युवा ऊर्जेचा वापर करून विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जाते. या भेटीत इम्रान खान यांनी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. महाडिक यांनीही या भेटीला महत्त्व देत चंद्रपूर ग्रामीणच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. याशिवाय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजयुमो ला नवे आयाम मिळणार असल्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, “हे पद फक्त माझे नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाचे आहे. युवा पिढीसाठी काम करणे हा माझा मुख्य ध्येय आहे.” इम्रान खान यांच्या ग्रामीण भागातील यशस्वी कार्यामुळे चंद्रपूर भाजयुमो उदाहरण ठरत असून, प्रदेश पातळीवरील हा संवाद भाजयुमोच्या कार्याला नवी दिशा देणारा ठरेल. या भेटीमुळे भाजयुमो मध्ये युवकांचा सहभाग वाढवण्याची नवी रणनीती तयार होत आहे. चंद्रपूर ग्रामीणसारख्या भागांतून मिळणाऱ्या यशाचा अनुभव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्च्याचे जाळे विस्तारण्याचा निर्धार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या फेरबदलीमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होत आहे. एकूणच,कृष्णराज महाडिक व इम्रान खान यांच्या या भेटीने भाजयुमो च्या युवक विस्तार कार्याला चालना मिळाली असून, महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणांच्या भूमिकेला नवे महत्त्व प्राप्त होणार आहे.
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!