भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
तालुक्यातील चोरा गावानजीक थेटे गावातील परिसरात रेती चोरट्यांचा भन्नाट प्लॅन फसल्याची घटना समोर आली आहे.
बंधारा फोडून मोठमोठे गोटे चोरून नेण्याचा डाव आखला होता; मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार असफल ठरला.
थेटे गाव येथील सर्वे क्रमांक १३५ मधील शेत परिसरात असलेल्या सरकारी बंधाऱ्याचे दगड (गोटे) काढून नेण्यासाठी चोरट्यांनी थेट बंधाराच फोडला. पण “ऑपरेशन गोटे” सुरू असतानाच तरुण शेतकरी युगेश खोब्रागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांचा सगळा प्लॅन पाण्यात गेला.
“गोटे उचलायला गेले… पण स्वतःच पळाले!”
स्थानिकांच्या मते, चोरटे इतक्या तयारीत आले होते की जणू काही बंधारा उचलूनच नेणार!
पण शेतकऱ्याची एन्ट्री होताच “काम अर्धवट, पळ काढा झटपट” अशी वेळ त्यांच्यावर आली.
बंधाऱ्याची अवस्था पाहून नागरिकही हैराण..!
फोटो पाहिल्यावर बंधाऱ्याची अवस्था इतकी बिकट दिसते की,
“हे बांधकाम आहे की तोडफोड स्पर्धा?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.


