“पाईप कमी… खड्डे जास्त!” नागरिकांच्या पैशांचा खेळ थांबवा; प्रशासनाला इशारा
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या अमृत योजना क्रमांक २ च्या कामांवर युवासेनेने जोरदार उपहासात्मक हल्ला चढवला आहे. “ही अमृत योजना आहे की नागरिकांच्या पैशांना खड्ड्यात घालण्याची योजना?” असा सवाल करत युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर गंभीर आरोप केले आहेत.
शहरातील अनेक भागांत पाईपलाईन कामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले, अर्धवट कामे केली आणि नंतर नागरिकांना धुळीचे, चिखलाचे आणि खड्ड्यांचे ‘गिफ्ट’ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काम सुरू झालं की जनता त्रस्त… आणि काम संपलं तरी रस्ता पुन्हा आजारी!” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
युवासेनेच्या तक्रारीनुसार, काही ठिकाणी कामांचा दर्जा इतका निकृष्ट आहे की नागरिकांमध्ये आता विनोदाने “पाईप आधी फुटणार की उद्घाटन आधी होणार?” अशी चर्चा सुरू झाली आहे. नियम, अटी आणि गुणवत्ता या फक्त कागदावरच दिसत असल्याचा टोला देखील लगावण्यात आला.
“कोट्यवधी रुपयांची योजना असूनही नागरिकांना स्वच्छ सुविधा कमी आणि धुळीचा त्रास जास्त मिळतोय. अधिकारी पाहणीपेक्षा फाईल पाहण्यात व्यस्त आहेत का?” असा उपरोधिक सवाल युवासेनेने केला आहे.
युवासेनेने संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असून, “जनतेच्या पैशांवर प्रयोग थांबवा, नाहीतर जनता उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील विविध प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेत जनतेचा विश्वास संपादन करणारे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे हे हा मुद्दा सहजासहजी सोडणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


